मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात बुधवारी ३१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीच्या या विक्रमी विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने मोलाचे योगादान दिले. याबरोबरच त्याने या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला.
या सामन्यात पंजाबने दिल्लीला केवळ ११६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पृथ्वी शॉबरोबर सलामीला येत आक्रमक खेळ केला. याबरोबरच त्याने अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे दिल्लीला विजय मिळवणे सोपे गेले. वॉर्नरने ३० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला.
वॉर्नरने या खेळीदरम्यान पंजाब किंग्सविरुद्ध १००० धावांचा टप्पा पार केला. पंजाब किंग्स विरुद्ध असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला. तसेच आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध १००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ रोहित शर्माला (Rohit Sharma) करता आला आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १०१८ धावा केल्या आहेत. वॉर्नरने पंजाबविरुद्ध १००५ धावा केल्या आहेत (Most runs against an opponent in the IPL).
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१०१८ धावा – रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१००५ धावा – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्स
९७८ धावा – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
९४९ धावा – विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
९४१ धावा – शिखर धवन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
दिल्लीचा विजय
या सामन्यात पंजाबने (DC vs PBKS) प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद ११५ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जितेश शर्माने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली, तर दिल्लीकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव, ललीत यादव आणि खलील अहमदने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून शॉने ४१ धावांची खेळी केली, तर वॉर्नरने नाबाद ६० धावांची खेळी केली. तसेच सर्फराज खानने नाबाद १२ धावांचे योगादान दिले. त्यामुळे दिल्लीने ११६ धावांचे आव्हान १०.३ षटकांत पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
चेन्नईच्या सलामीवीराने लग्नासाठी सोडला बायोबबल, जाणून घ्या कधी होणार पुनरागमन