---Advertisement---

व्वा! मेगा लिलाव झाला, तर हैदराबाद करणार ‘या’ दमदार खेळाडूला रिटेन; वॉर्नरचे संकेत

---Advertisement---

आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत मुंबई इंडियन्सने १३ व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. यानंतर आता आयपीएल २०२१ला काही महिन्यांचाच कालावधी राहिला आहे. त्यापूर्वी मेगा ऑक्शन (मेगा लिलाव) होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आशा व्यक्त केली जात आहे की, सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज केन विलियम्सन हैदराबाद संघातच राहील. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरनेही विलियम्सनबाबत संकेत दिले आहेत.

वॉर्नरने संकेत दिले की, सन २०२१ मधील आयपीएलच्या मेगा लिलावात जरी विलियम्सनला मुक्त केले, तरीही त्यांच्याकडे पर्याय असेल की ते राईट टू मॅचमार्फत त्याला पुन्हा संघात घेऊ शकतील.

चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना वॉर्नरची पुष्टी
मागील तीन वर्षांपासून विलियम्सनचा फॉर्म पाहता सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या लिलावापूर्वी त्याला रिटेन करतील. न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनला २०१८ साली मेगा लिलावात हैदराबादने ३ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना वॉर्नरने याची पुष्टी केली की, तो विलियम्सनला आपल्या संघात ठेवेल.

विलियम्सन आतापर्यंत नियमितपणे संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे. परंतु सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला बाहेर बसावे लागले होते. संघ व्यवस्थापनाने २०१८-१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद सोपवत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु त्याने फलंदाजी आणि नेतृत्त्व अशा दोन्ही भूमिका लिलया पार पाडल्या. विलियम्सनने २०१८ मध्ये ७३५ धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ही कॅप मिळते) आपल्या नावावर केली होती. या हंगामात त्यांनी अंतिम सामन्यात घडक दिली होती.

दुसरीकडे २०१९ च्या आयपीएल हंगामात त्याला केवळ ९ सामन्यात १५६ धावाच करता आल्या. या हंगामात हैदराबादने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता.

आयपीएल २०२० मध्ये संघ व्यवस्थापनाने संघाचे नेतृत्त्व वॉर्नरकडे सोपवले. मात्र, याचा विलियम्सनच्या फॉर्मवर कोणताही फरक पडला नाही. विलियम्सनने या हंगामात १२ सामने खेळत ३१७ धावा कुटल्या. त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्याने एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात अर्धशतकेही ठोकली. सध्या पुढील वर्षीच्या लिलावाबाबत कोणतीही माहिती नाही.

हैदराबाद बीसीसीआयच्या अधिकृत माहितीची वाट पाहत आहे. यामध्ये संघांना मजबूत संघबांधणी करण्याची संधी मिळेल. जर संघांच्या संख्येत वाढ झाली नाही, तर मेगा लिलाव होणार नाही. बीसीसीआय कदाचित मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ ला सुरुवात करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती

-राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण

-“धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल”, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

-ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार

-सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

-भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---