दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामना सध्या ब्लोएमफातेन येथे खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शानदार सुरुवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने मागील सामन्यातील अपयश भरून काढत केवळ 87 चेंडूंवर शानदार शतक झळकावले. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील विसावे शतक ठरले.
पहिल्या वनडेत दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळाचित झालेल्या वॉर्नर याने या सामन्यात चांगली सुरुवात केली. ट्रेविस हेडसह त्याने शतकी भागीदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मार्नस लॅब्युशेन याला साथीला घेत तिसऱ्या गड्यासाठी त्याने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. त्याने अवघ्या 87 चेंडूंमध्ये आपले विसावे वनडे शतक पूर्ण केले. यामध्ये बारा चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी त्याने 93 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या.
या शतकासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला. त्याच्या नावे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वच्या सर्व 46 शतके आहेत. त्याने भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर याचा 45 शतकांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच वर्तमान क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतर सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज देखील तो बनला आहे. विराटच्या नावे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 शतके आहेत.
(David Warner Hits 20th ODI Century Against South Africa Surpassed Sachin Tendulkar)
महत्वाच्या बातम्या –
श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव