मंगळवारी (३० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेसाठी रिटेंशन प्रक्रिया पार पडली. या रिटेन प्रक्रियेत अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले. काही युवा खेळाडूंना कोट्यवधी रुपयांसह संघात कायम करण्यात आले, तर अनेक दिग्गज खेळाडूंना फ्रांचायजींनी मुक्त केले आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर. आता सनरायझर्स हैदराबाद संघातून बाहेर पडल्यानंतर डेविड वॉर्नरने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत डेविड वॉर्नरला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरल्यामुळे त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला प्लेइंग इलेव्हेनमधून देखील बाहेर करण्यात आले होते. त्यामुळे डेविड वॉर्नरला आधीच माहीत होते की, सनरायझर्स हैदराबाद संघ त्याला कायम करणार नाही.
एका चाहत्याने डेविड वॉर्नरला इंस्टाग्रामवर विचारले होते की,”जर सनरायझर्स हैदराबाद संघाने तुला कायम केले, तर तुला खेळायला आवडेल का?” या प्रश्नाचे उत्तर देताना डेविड वॉर्नरने म्हटले होते की, “ते तसं काहीच करणार नाही, मी याबाबत काहीच बोलू शकत नाही.”
मंगळवारी कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आणि डेविड वॉर्नरचे बोलणे खरे ठरले. सनरायझर्स हैदराबाद संघाने केन विलियम्सन, उमरान मलिक आणि अब्दुल समद यांना कायम केले. तर डेविड वॉर्नर आणि राशिद खान सारख्या दिग्गजांना मुक्त केले. डेविड वॉर्नरला मुक्त केल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने राशिद खान आणि केन विलियमसन सोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन देत, “हैदराबाद सोबतचा अध्याय संपला,” असे लिहिले आहे. तसेच त्याने सर्व सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CW7b9y7p2uc/?utm_medium=copy_link
डेविड वॉर्नरने गेल्या काही वर्षांपासून सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या संघाला त्याच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद देखील मिळवून दिले आहे. तसेच संघातून मुक्त केल्यानंतर त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. डेविड वॉर्नर आता मेगा लिलावात उतरणार आहे. त्यामुळे सर्व संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडू शकतात. कारण नुकताच झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: केएल राहुलच होणार शेट्टी कुटुंबाचा जावई? अथियासोबतची रेड कार्पेटवरील एन्ट्री ठरतेय लक्षवेधी
ऑस्ट्रेलियाला धूळ चरण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज जडेजाच्या व्हिडिओ पाहून करतोय सराव