ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर सध्या आपल्या दुखापतीतून सावरत आहे.भारताविरुद्धच्या वनडे सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नर संपूर्ण टी २० मालिकेतून तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यातूनही बाहेर झाला होता. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेला असूनही त्याच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह होते. मात्र या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक कोच एंड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी स्पष्ट केले की 100% फिट नसूनही वॉर्नर मैदानात उतरू शकतो.
वॉर्नरच्या उपस्थिती बद्दल बोलताना मॅक्डोनाल्ड म्हणाले, “आता हा एक मात्र पर्याय उपलब्ध आहे. असे होऊ शकते की तो (वॉर्नर) 100% फिट नसेल, कारण तो दुखापतीतून सावरत आहे. जोपर्यंत तो मैदानावर उतरत नाही तोपर्यंत काहीही स्पष्टता करता येणार नाही. जर तो 90- 95% फिट असेल, आणि खेळण्यास तयार असेल तर तो मैदानावर खेळू शकतो.”
मॅक्डोनाल्ड पुढे म्हणाले की, “वॉर्नर पूर्णतः खात्रीशीर आहे की तो खेळेल. आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तो पुनरागमनासाठी उत्सुक आहे व आम्ही देखील. सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून दुखापतग्रस्त होणे हे फार वाईट असते, जे त्याच्यासोबत झाले आहे.”
दुसरा सलामीवीर विल पुकोस्कीला सराव सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. पुकोस्की बद्दल बोलताना मॅक्डोनाल्ड म्हणाले, “त्याच्या सर्व गरजेच्या टेस्ट होतील व त्यानंतरच तो निवडीसाठी उपलब्ध असेल. फलंदाजीत सुधारणा गरजेची आहे व त्याच्या आगमनाने ती पूर्ण होईल.”
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसरा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.अशा परिस्थितीत वॉर्नरच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियन संघाला मजबुती मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
– सिडनी कसोटीत रोहितसोबत शुबमन नव्हे तर याने करावी ओपनिंग, सुनील गावसकरांनी सांगितले नाव
– धक्कादायक! इंग्लंडच्या या दोन माजी अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर केला वर्णभेदाचा आरोप
– रहाणेच्या नेतृत्त्वाची माजी महिला क्रिकेटरला पडली भुरळ; म्हणाली, हे काम फक्त तोच करू शकतो