ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने म्हटले आहे की, कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितींना लक्षात घेता एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून मला आपल्या भविष्याचा पुनर्विचार करावा लागेल. कोविड-१९मुळे खेळाडूंवर लावण्यात आलेल्या कडक नियमांमुळे त्यांना आपल्या कुटुंबाविना प्रवास करावा लागणार आहे. ३३ वर्षीय वॉर्नरवर आपली पत्नी कँडीस आणि ३ मुलींची जबाबदारी आहे. त्यामुळे तो म्हणाला की, कुटुंबापासून दूर राहणे माझ्यासाठी सोपे नसेल.
वॉर्नर म्हणाला, “निश्चितपणे माझ्या तीन मुली आणि माझी पत्नी हे माझ्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग आहेत. आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा प्रथम विचार केला पाहिजे मग क्रिकेटचा आणि अशा कठीण काळात या निर्णयांना महत्त्व दिले पाहिजे. मी आताही क्रिकेट चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन. पण, यंदा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार नाही. विश्वचषकात खेळणे आणि विजय मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी सन्मानाची गोष्ट असते. पण आता विश्वचषक स्थगित करण्यात आले आहे. जर, भारतात टी२० विश्वचषकाचे आयोजन झाल्यास माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा मला पुन्हा विचार करावा लागेल. कारण हा माझ्यासाठी मोठा पारिवारिक निर्णय आहे.”
कोविड-१९ या महामारीनंतर काही देशांत क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. अनेक नव्या नियमांसह जैव सुरक्षित वातावरणात सामने खेळले जात आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये अद्याप क्रिकेटची सुरुवात झाली नसल्यामुळे क्रिकेटपटूंना आपापल्या प्रांतात सराव करण्याव्यतिरिक्त दूसरा उपाय नाही.
वॉर्नरच्या मते, व्हिक्टोरियामध्ये कोविड-१९ची वाढती प्रकरणे पाहता तेथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांसह क्रिकेट ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय सामन्यांचेही यजमानपद गमावू शकते. याविषयी बोलताना वॉर्नर म्हणाला, “मी फक्त प्रांतीय क्रिकेटचे उदाहरण दिले आहे. परंतु, खरचं व्हिक्टोरिया शेफिल्ड शील्ड क्रिकेटचे आयोजन करण्यात यशस्वी होईल का? वर्तमान परिस्थिती पाहता मला हे अशक्य वाटत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
एलिसा पेरीच्या घटस्फोटनंतर का ट्रोल होतोय ‘हा’ भारतीय खेळाडू, घ्या जाणून
हसीन जहानला येतेय ‘पिया की याद’; परंतु चाहते म्हणतात, शमी तर…
पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…
ट्रेंडिंग लेख –
आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर
एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…