इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अपवाद वगळता वेस्ट इंडिजचे खेळाडू तुफान कामगिरी करताना दिसत आहेत. यापैकीच एक म्हणजे रोवमन पॉवेल होय. पॉवेलने या हंगामात तो किती लांब षटकार खेचू शकतो, हे दाखवून दिले आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीने त्याला मेगा लिलावात २.८ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. यादरम्यान पॉवेलने काही सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन करत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. अशात त्याने आता आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. तसेच, त्याने सांगितले की, तो अशा कुटुंबातून येतो, जिथे शेती हेच कमाईचे प्रमुख साधन आहे. त्याने हेही सांगितले की, तो क्रिकेटपटू बनला नसता, तर काय केले असते?
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाशी झालेल्या चर्चेत रोवमन पॉवेल (Rovman Powell) म्हणाला की, “मी जमैकातील एका छोट्याशा गावातून आलो आहे. तिथे मोठ्या संख्येने कुटुंबांचे कमाईचे प्रमुख साधन हे शेती आहे. मात्र, माझे लहानपणीचे स्वप्न होते की, मी आपल्या कुटुंबाला क्रिकेट आणि शिक्षणाच्या जोरावर गरिबीतून बाहेर काढावे. देवाच्या कृपेने मी क्रिकेट व्यवस्थित खेळत होतो. मी व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्यापूर्वी, सैन्यात जाणार होतो. जर मी क्रिकेटपटू बनलो नसतो, तर सैनिक बनून देशाची सेवा केली असती.”
यावेळी पॉवेलने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतचीही प्रशंसा केली. तसेच, तो म्हणाला की, आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वेस्ट इंडिज संघ बैठक घेते आणि चर्चा करते की, डावखुऱ्या फलंदाजाला धावा करण्यापासून रोखण्यासाठी काय केले पाहिजे? पॉवेल म्हणाला की, “रिषभ पंत असा खेळाडू आहे, ज्याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. कारण, तो चांगला फलंदाज आहे. जेव्हाही आम्ही त्याच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळतो, तेव्हा आमची बैठक होते की, आम्ही कशाप्रकारे त्याला धावा करण्यापासून रोखू शकतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मला दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले आणि पंत म्हणाला की, तो मला संघात घेण्याबद्दल खूप उत्साहित आहे. तो मला तीच भूमिका देईल, जी मला आवडते. तसेच, त्याने दिलेला शब्दही पाळला,” असे पुढे बोलताना पॉवेल म्हणाला. यापूर्वी पॉवेलने आयपीएल इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
पॉवेलची आयपीएल २०२२मधील कामगिरी
रोवमन पॉवेल याने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २५.६३च्या सरासरीने २०५ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ अर्धशतकही आपल्या नावावर केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ
केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश