आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा दुसरा सामना आज रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सराव सत्रात जखमी झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांतच्या पाठीला दुखापत झाली आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा दुखापत झाली होती. यावर्षी जानेवारीत इशांतला घोट्याला दुखापत झाली होती. एका महिन्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत परतला, पण त्याच घोट्यात त्याला पुन्हा दुखापत झाली होती.
दिल्लीच्या कॅपिटल्समध्ये इशांतशिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि आवेश खान हेदेखील भारतीय वेगवान गोलंदाज उपस्थित आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकाला खेळायची संधी मिळू शकते.
दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयर अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टोईनिस, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल (कर्णधार / यष्टीरक्षक), मयंक अगरवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, मनदीप सिंग, कृष्णप्पा गौथम, ख्रिस जॉर्डन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुजीब-उर-रहमान
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्त झालो म्हणून हलक्यात घेऊ नका; या खेळाडूच्या खेळीने दिला संदेश
-सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण
-सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर
ट्रेंडिंग लेख-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-चेन्नईच्या ‘या’ ५ खेळाडूंनी चारली मुंबईला धूळ, ३६ वर्षीय खेळाडूने केले नेत्रदिपक प्रदर्शन
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा