---Advertisement---

अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच

On: सोमवार, जुलै 19, 2021 10:13 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारी (१८ जुलै) पहिला वनडे सामना पार पडला. ज्यामध्ये पुन्हा एकदा श्रीलंका संघाच्या हाती निराशा आली आहे. भारतीय संघाने या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. तसेच हा सामना सुरू असताना असा काही प्रकार घडला होता, ज्यामुळे हा सामना काही वेळ थांबवण्यात आला होता.

क्रिकेट सामना सुरू असताना बऱ्यचदा सामना थांबवण्यात येत असतो. त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. एखाद्या वेळेस खेळाडूला दुखापत होते तेव्हाही सामना काहीवेळ थांबवण्यात येत असतो. परंतु रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चक्क पतंगामुळे सामना थांबवण्यात आला होता. ज्यावेळी हा सामना थांबवण्यात आला होता त्यावेळी श्रीलंका संघाने १५० धावांचा पल्ला गाठला होता. परंतु सामना पुन्हा सुरू होताच दीपक चाहरने श्रीलंका संघाला २ मोठे धक्के दिले. (Deepak chahar gets 2 wickets after match stop due to kite come in ground)

चाहरने ३७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चरिथ असालांकाला ३८ धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर ३९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने वांनेदू हसारंगाला बाद करत भारतीय संघाला ६ वा गडी बाद करून दिला होता. सलग दोन षटकांमध्ये दीपक चाहरने भारतीय संघाला २ गडी बाद करून दिले होते. तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. त्याने ९ षटके गोलंदाजी करत ६३ धावा खर्च केल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाकडून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांना एकत्र संधी देण्यात आली होती. दोघेही २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच एकत्र मैदानात उतरले होते. त्यांनी भारतीय चाहत्यांना निराश केले नाही. दोघांनाही प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले होते. भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीमुळे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ५० षटकअखेर ९ बाद २६२ धावा केल्या होत्या.

श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशनने ५९ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासोबतच भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मिड ऑनवर धवनचा सुपर झेल, मग गब्बर स्टाईल सेलिब्रेशनही; हा शानदार क्षण तुम्ही पाहिलाय ना?

वयाच्या ३४व्या वर्षी ‘या’ अष्टपैलूचा मोठा विक्रम, ओलांडला ५०० विकेट्स अन् १२००० धावांचा आकडा

‘कुलचा’ जोडीचे धमाकेदार पुनरागमन, एकाने पहिल्याच चेंडूवर धाडले तंबूत; दुसऱ्याच्या ४ चेंडूत २ विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---