भारतीय संघातील खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. या चाहत्यावर्गात महिला वर्ग खूप मोठा आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज दिपक चाहर याने आयपीएलमधील त्याच्या जबरदस्त कामगिरीने अनेक क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. दरम्यान दीपकने आपला नवीन लूकमधील फोटो पोस्ट केला आहे, त्या लूकमध्ये तो जबरदस्त दिसत आहे. यावर अगदी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षीने प्रतिक्रिया दिली आहे.
दीपकने प्रसिद्ध चित्रपट ‘गजनी’मधील आमीर खानसारखा लूक केला आहे. त्याच्या लूकवर धोनीच्या पत्नी साक्षी हिनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, जी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत खाली लिहिले की, ‘माझा नवीन लूक, तुम्हाला सर्वात जास्त फोटो कोणता आवडला?’ हा फोटो दीपकची बहिण मालती हिने काढला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने त्याच्या बहिणीचे आभारही मानले आहेत.
https://www.instagram.com/p/CP4tZN9FmCe/?utm_source=ig_web_button_share_sheet
या फोटोवर साक्षीने ‘खतरनाक लूक दीपक’ अशी कमेंट केली आहे.
दीपकने आतापर्यंत भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले नाहीत. परंतु त्याने एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आहे. दीपकने भारतासाठी 3 एकदिवसीय सामने आणि 13 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकते. दीपक इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अथक प्रयत्नांना अखेर यश! १३ आयपीएल अर्धशतके करणाऱ्या धुरंधराचे भारतीय संघात होणार पदार्पण?
बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूची धर्मपत्नी आहे कोहलीची जबरदस्त चाहती