भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला सुरुवात करणार आहे. मालिका सुरू होण्यास २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याला दुखापत झाली होती.
वेस्ट इंडिज विरुद्ध झालेली दुखापत
कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात दीपकच्या उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग ताणले गेले होते. या सामन्यात त्याने पूर्ण ४ षटके गोलंदाजी केली नव्हती. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) या गोष्टीची पुष्टी करण्यात आली. त्याने संघाचे बायो-बबल सोडले असून, आता तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन करेल. यामुळे दीपकच्या आयपीएल २०२२ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये सहभागावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
आयपीएल लिलावात ठरला महागडा खेळाडू
दीपक नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यापूर्वीही तो चेन्नईचाच भाग होता. श्रीलंका व दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केलेल्या अष्टपैलू कामगिरी मुळे त्याला ही बोली लावण्यात आली.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्र्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना- २४ फेब्रुवारी- लखनऊ
दुसरा टी२० सामना- २६ फेब्रुवारी- धर्मशाला
तिसरा टी२० सामना- २७ फेब्रुवारी- धर्मशाला
महत्वाच्या बातम्या-
PHOTO: विश्रांतीच्या काळात रिषभ आजमवतोय ‘या’ खेळात हात; चाहते म्हणाले.. (mahasports.in)
अव्वल स्थान राखण्यासाठी हैदराबादसमोर केरलाचे आव्हान (mahasports.in)
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)