इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दीपक हुड्डाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने धुमाकूळ घातला होता. परंतु त्याने आता मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दीपक हुड्डा देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु आता तो या संघाकडून खेळताना दिसून येणार नाही. त्याने बडोदा क्रिकेट संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजित लेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. असे देखील म्हटले जात आहे की, तो लवकरच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. गतवर्षी झालेल्या हंगामात कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांच्यात वाद झाला होता.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने गतवर्षी कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांच्यात झालेल्या वाद विवादानंतर दीपक हुड्डाला अनुशासनात्मक आणि खेळाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविल्याबद्दल निलंबित केले गेले होते. हुड्डाने सैय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सराव शिबिरातून माघार घेतली होती. हुड्डाने दावा केला होता मी, पंड्याने त्याच्यासोबत गैरवर्तणूक केली होती. (Deepak hooda quits baroda for Rajasthan)
दीपक हुड्डाच्या जाण्याने माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने निराशा व्यक्त केली आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, “अनेक क्रिकेट संघ अशा खेळाडूंना गमावतात, ज्यांचे नाव भारतीय संघाच्या संभावित खेळाडूंच्या यादीत आहे. दीपक हुड्डाचे बडोदा क्रिकेटला सोडून जाणे खूप नुकसानदायक आहे. तो आणखी १० वर्षे संघात खेळू शकला असता कारण तो युवा खेळाडू आहे. तो बडोदाचा असल्यामुळे मी खूप निराश झालो आहे.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1415569196633649156?s=20
दीपक हुड्डाची कारकीर्द
दीपक हुड्डाने २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने एकूण त्याने ४६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९ शतक आणि १५ अर्धशतकांच्या मदतीने २९०८ धावा केल्या आहेत. यासह ६८ लिस्ट ए सामन्यात त्याने २०५९ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने एकूण ७६ सामने खेळले आहेत. यात त्याला ७४१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजवर श्रीलंकेत फक्त ‘या’ ३ भारतीय कर्णधारांनी ठोकलंय शतक, नवा कॅप्टन धवन करेल हा पराक्रम?
विराट ब्रिगेडवर कोरोनाचं संकट, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय






