---Advertisement---

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 6:49 PM
Deepak-Hooda
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ विकेट्सने जिंकून भाकताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, हा सामना अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda)याच्यासाठी खास ठरला. त्यामुळे त्याने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दीपक हुडाचे पदार्पण
या सामन्यातून दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याला वनडे पदार्पणाची कॅप भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते देण्यात आली. तो वनडे खेळणारा भारताचा २४३ वा खेळाडू ठरला. त्याला पदार्पणाची कॅप विराट देत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला होता.

पदार्पणाबद्दल हुडा भावुक 
वनडे पदार्पण झाल्यानंतर हुडा भावुक झाला. त्याने सामन्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने पदार्पणाची कॅप मिळतानाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळल्याबद्दल मला गौरवान्वित आणि भाग्यशाली असल्याचे वाटत आहे. विराट कोहली भैय्याकडून कॅप मिळणे माझ्यासाठी खूप खास आणि स्वप्न पूर्ण होण्यासारखा क्षण होता. जे या प्रवासात माझ्याबरोबर आहेत, त्या सर्वांना धन्यवाद.’

हुडाने फलंदाजीत दाखवली चमक
हुडाला या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली नाही, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली. वेस्ट इंडिजने भारताला १७७ धावांचे आव्हान विजयासाठी दिले होते. यावेळी हुडा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्याने सूर्यकुमार यादवला चांगली साथ देताना ६२ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीने भारताने २८ षटकातच १७८ धावा करत सामना आपल्या नावावर केला.

हुडाने ३२ चेंडूत २ चौकारांसह नाबाद २६ धावा केल्या. तसेच सूर्यकुमारने नाबाद ३४ धावा केल्या. त्यापूर्वी कर्णधार रोहितने ६० धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती. तर, इशान किशनने २८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला हा सामना सहज जिंकता आला. तत्पूर्वी भारताकडून गोलंदाजीतही चांगली कामगिरी झाली. भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर  वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स, प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान

पहिल्या वनडेत फ्लॉप ठरूनही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी, मोडला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड

विश्वविजेत्या युवा टीम इंडियाला शुभेच्छा देताना शाहीद कपूरकडून ‘गलती से मिस्टेक’, सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---