आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (दि. 20 एप्रिल) दिल्ली संघाने कोलकातावर शेवटच्या षटकात 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा पाच पराभवांतर हंगामातील पहिलाच विजय ठरला. या विजयानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने आपल्याच फलंदाजांवर टीका केली.
दिल्लीला या सामन्यात विजयासाठी 128 धावांचे माफक आव्हान मिळाले होते. मात्र, कर्णधार वॉर्नर वगळता इतर फलंदाज अक्षरशः धावांसाठी संघर्ष करताना दिसले. अखेर अक्षर पटेल यांनी झुंज देत अखेरच्या षटकात संघाचा विजय साकार केला. त्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार वॉर्नर याने आपल्या फलंदाजांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला,
“तुम्ही या स्तरावर खेळत असताना तुम्हाला वेगवान गोलंदाजी खेळण्याची कसब येणे आवश्यक आहेच. वरूण चक्रवर्तीचे चेंडू समजण्यात आमचे फलंदाज अयशस्वी ठरले. त्याला आम्ही खूपदा बॅकफूटवर खेळलो. फिरकी गोलंदाजी तुम्हाला चेंडू हातातून कसा सुटतो त्यानुसार खेळायची असते.”
वॉर्नर याने व्यक्त केलेली शंका अगदी योग्य ठरते. स्वतः वॉर्नर व अक्षर पटेल वगळता आत्तापर्यंत दिल्लीचा फलंदाज आपल्या लौकिला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही. युवा फलंदाज सर्फराज खान, पृथ्वी शॉ, यश धूल व अभिषेक पोरेल यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आले. मनीष पांडे याने थोडाफार संघर्ष दाखवला. मात्र, मिचेल मार्श व रोवमन पॉवेल हे विदेशी फलंदाज देखील अद्याप आपली छाप पाडू शकले नाहीत. विशेष म्हणजे या सर्व फलंदाजांवर कोटींची बोली लागली आहे.
दिल्ली विरुद्ध कोलकाता (Delhi vs Kolkata) सामन्यात नाणेफेक जिंकत डेविड वॉर्नर (David Warner) याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 127 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत 128 धावा केल्या आणि 4 विकटे्सने सामना जिंकला.
(Delhi Capitals Skipper David Warner Upset For Batting Intent Of Batters In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! Asian Gamesमध्ये भारतीय संघ पाठवण्यास दिला थेट नकार, कारण घ्या जाणून
पाच पराभवांनी गांगुलीची हवा झालेली टाईट, दिल्लीने विजय मिळवताच म्हणाला, ‘माझी पहिल्या कसोटीतील धाव…’