---Advertisement---

कोरोनाही थांबवू शकला नाही दिल्लीचा विजयरथ; महत्त्वाचा खेळाडू नसूनही पंजाबविरुद्ध मिळवला ९ विकेट्सने विजय

On: बुधवार, एप्रिल 20, 2022 10:47 PM
David-Warner
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाब किंग्सविरुद्ध बुधवारी (दि. २० एप्रिल) खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ३२व्या सामन्यात दमदार विजय मिळवला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने ९ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार डेविड वॉर्नर ठरला. तसेच, गोलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले. या सामन्यात कुलदीप यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, दिल्ली संघातील महत्त्वाचे खेळाडू टीम सेफर्ट आणि मिशेल मार्श कोरोनाग्रस्त आहेत. मात्र, याचा दिल्लीवर काहीही फरक पडला नाही. संघाने शानदार विजय खिशात घातला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फंलदाजी करताना पंजाब किंग्स संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद ११५ धावा केल्या होत्या. दिल्लीने हे आव्हान अवघ्या १०.३ षटकातच १ विकेट गमावत पूर्ण केले. या विजयामुळे दिल्लीला गुणतालिकेतही चांगलाच फायदा झाला आहे.

डेविड वॉर्नरचे शानदार अर्धशतक
दिल्ली संघाकडून फलंदाजी करताना डेविड वॉर्नरने (David Warner) शानदार फटकेबाजी केली. त्यानेच या सामन्यात दिल्लीकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३० चेंडूत १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर पृथ्वी शॉनेही चांगली खेळी केली. त्याने २० चेंडूत ४१ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. तसेच, सर्फराज खाननेही नाबाद १३ धावांचे योगदान दिले. या तिघांच्या खेळीमुळे दिल्लीने पंजाबविरुद्ध शानदार विजय साकारला. यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना राहुल चाहरला एक विकेट मिळवण्यात यश आले.

पंजाबच्या फलंदाजांची निराशा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने २३ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले होते. त्याच्याव्यतिरिक्त फक्त कर्णधार मयंक अगरवाललाच २४ धावांचे योगदान देता आले. बाकीच्या एकाही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. शिखर धवन (०९), जॉनी बेअरस्टो (०९) आणि लियाम लिविंगस्टोन (०२) यांसारख्या खेळाडूंनाही या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. या चारही गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या. तसेच, मुस्तफिजूर रहमाननेही १ विकेट खिशात घातली.

या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत वरच्या स्थानावर उडी मारली आहे. दिल्ली संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानी विराजमान झाला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स संघाला चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागल्याने ते ६ गुण असूनही गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुंबईचा सूर्य बुडताना पाहून रोहितला आठवला ‘हा’ वेगवान गोलंदाज; केली संघात सामील करण्याची मागणी?

‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---