---Advertisement---

ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक

On: मंगळवार, मे 18, 2021 5:42 PM
---Advertisement---

भारताचा आंतराराष्ट्रीय कुस्तीवीर आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या विरोधात त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी सुशील कुमारला अटक होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच सुशील कुमार विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते बेपत्ता असल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. तसेच त्यांची माहिती देणाऱ्यांना १ लाखांचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा दिल्ली पोलिसांनी केली होती. आता न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन नाकारला असल्याने भारताच्या एकेकाळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारवर अटक केली जाण्याची नामुष्की ओढवणार आहे.

काय आहे हे प्रकरण?
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत एकूण पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी सागर राणा नावाच्या कुस्तीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी एफआयआरमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याचे देखील नाव समोर आले होते. त्यांनतर पोलिसांनी केलेल्या तपासात सुशील कुमारचा या घटनेमध्ये सहभाग असल्याचे पुरावे मिळाले होते.

भारताचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू आहे सुशील
सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देशाला ५६ वर्षांनंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केलेले. सुशीलने सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. तसेच, भारतातील चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मश्री देखील त्याच्या नावे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! ‘मिस्टर ३६०’ पुन्हा दिसणार नाही दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत; बोर्डाने केले स्पष्ट

पाकिस्तानी गोलंदाजाचा धारदार ‘रिव्हर्स स्विंग’ पाहून दिग्गज फिरकीपटू अश्विनही झाला थक्क; पाहा तो व्हिडिओ

डॉट, नो शॉट अँड आऊट; जेव्हा मॅकग्राच्या पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजांची झाली होती दयनीय अवस्था

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---