पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलींच्या गटात श्रावी देवरे हिने तर, मुलांच्या गटात नमिश हूड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत श्रावी देवरे हिने अव्वल मानांकित स्वरा जावळेचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने आर्या पाठकचा 6-0, 6-0 असा तर, पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरने आयुश्री तरंगेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटात पुण्याच्या नमिश हूड याने कर्नाटकाच्या आठव्या मानांकित लेमूल अल्लादीचा 6-2, 6-1असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने अधिराज दुधानेचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला. क्वालिफायर सर्वज्ञ सरोदे याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या शौर्य बोऱ्हाडेचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले.
निकाल: मुख्य ड्रॉ(उप-उपांत्यपूर्व) फेरी: मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.अधिराज दुधाने 6-3, 6-2;
ऋषिकेश माने[5]वि.वि.अंशुल पुजारी 6-3, 6-0;
आरव पटेल[3] वि.वि.युगंधर शास्त्री 6-2, 6-3;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.शौर्य बोऱ्हाडे 6-2, 6-2;
नमिश हूड वि.वि.लेमूल अल्लादी[8] 6-2, 6-1;
नीरज जोर्वेकर वि.वि.हर्ष परिहार 6-1, 6-2;
वरद उंडरे[2]वि.वि.शुभ नाहाटा 6-1, 6-1.
मुली:
श्रावी देवरे वि.वि.स्वरा जावळे[1] 7-6(6), 6-2;
काव्या तुपे[6]वि.वि.सान्वी राजू 6-2, 6-1;
रितिका दावलकर [3] वि.वि.विवा तलरेजा 6-0, 6-0;
मायरा टोपणो वि.वि.वीरा हरपुडे 6-0, 0-3 सामना सोडून दिला;
शिबानी गुप्ते वि.वि.सारा फेंगसे 6-2, 1-0 सामना सोडून दिला;
सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.आर्या पाठक 6-0, 6-0;
रित्सा कोंडकर[5] वि.वि.आयुश्री तरंगे 6-1, 6-1;
जान्हवी चौगुले[2] वि.वि.शमीक्षा शेट्टी 6-1, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस२०० वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद: आठ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
मोठी बातमी! साहाला धमकावणे पडले महागात, बीसीसीआयने केली मोठी कारवाई
गुजरात टायटन्सच्या मॅच फिनिशर तेवतियाचा फॅन बनले महान फलंदाज गावसकर, म्हटले ‘आइस मॅन’