पुणे- बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई, मृणाल शेळके, सृष्टी सूर्यवंशी, श्रेया पठारे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या देवांशी प्रभुदेसाई हिने कर्नाटकच्या व लकी लुझर ठरलेल्या गौरी यलेचा 6-1, 6-0 असा पराभव केला. क्वालिफायर सृष्टी सूर्यवंशी हिने आपली राज्य सहकारी जान्हवी चौगुलेचा 6-3, 7-5 असा तर, पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या श्रेया पठारेने पार्थसारथी मुंढेचा 6-3, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
चुरशीच्या लढतीत देवाश्री महाडेश्वरने आरोही देशमुखचा 4-6, 7-5, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव केला. गुजरातच्या आठव्या मानांकित पिया मिस्त्रीहिने महाराष्ट्राच्या इशा मोहितेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(0) असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुली:
देवांशी प्रभुदेसाई(महा)[1] वि.वि.गौरी यले(कर्नाटक)6-1, 6-0;
व्रण्डिका राजपूत(महा)वि.वि.स्वरा जावळे(महा)6-4, 6-2;
देवाश्री महाडेश्वर(महा)वि.वि.आरोही देशमुख(महा)4-6, 7-5, 6-0;
साईइती वराडकर(महा)वि.वि.काव्या तुपे(महा)6-1, 6-0;
पिया मिस्त्री(गुजरात)[8] वि.वि.इशा मोहिते(महा)6-3, 7-6(0);
मृणाल शेळके(महा)वि.वि.रानिया ठाकूर(महा)6-0, 6-3;
सृष्टी सूर्यवंशी(महा)वि.वि.जान्हवी चौगुले(महा)6-3, 7-5;
श्रेया पठारे(महा)वि.वि.पार्थसारथी मुंढे(महा)6-3, 7-5;
ह्रितिका कापले(महा)वि.वि.श्रेया होनकन(महा)6-3, 6-1;
मेहक कपूर(महा)[3]वि.वि.याना अरोरा(महा)6-1, 6-0
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार