आयपीएल २०२० संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलिया दौर्यावरील सामने पाहण्यात दंग आहेत. दुसरीकडे, एमएस धोनीच्या चाहत्यांची नजर पुन्हा एकदा दुबईकडे लागली आहे. कारण धोनी आयपीएल संपल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत पोहोचला आहे. धोनी आपले कुटुंब व मित्रपरिवारासह दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसून आला. धोनीची मुलगी झिवा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही छायाचित्रे नुकतीच व्हायरल झाली आहेत. यामध्ये धोनीचे कुटुंब व काही मित्र दिसून येत आहेत.
दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे धोनी
नुकत्याच संपलेल्या आयपीएलनंतर धोनी आपल्या मित्र परिवारासह दुबईमध्ये दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी साक्षी व मुलगी झिवा देखील होते. याच दरम्यान सर्वांनी साक्षीचा वाढदिवस देखील दुबईमध्ये साजरा केला. मागील आठवड्यात धोनीचा एका पार्टीमधील डान्स करतानाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने पोस्ट केला होता. यामध्ये धोनी, साक्षी आणि झिवा दिसत होते.
https://www.instagram.com/p/CIG5kHFnD8b/?utm_source=ig_web_copy_link
झिवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल झाले फोटो
धोनीची मुलगी झिवा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये धोनी आपले कुटुंब व मित्रांसह असल्याचे दिसत आहे. झिवाने या फोटोंमध्ये पांढरा ड्रेस घातला आहे आणि वेगवेगळ्या हेअर स्टाईल केल्या आहेत. काही फोटोंमध्ये ती एकदम शांत दिसतेय, तर काही फोटोंमध्ये वेडेवाकडे तोंड बनवत आहे. यासर्व फोटोंमध्ये झिवा अत्यंत गोंडस दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CHvTKW2HIRz/?utm_source=ig_web_copy_link
धोनी व चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा तेरावा हंगाम ठरला होता निराशाजनक
आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामात प्ले-ऑफ्सपर्यंत मजल मारलेल्या चेन्नईला तेराव्या हंगामात सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. संघासोबत धोनीची वैयक्तिक कामगिरीही तितकीशी चांगली राहिली नव्हती. धोनीच्या अनेक निर्णयांवर चौफेर टीका झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ