29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईमधील एमएस चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) कालपासून(2 मार्च) सरावाला सुरुवात केली आहे.
यावेळी धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी स्टेडियममध्ये पहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सराव सत्रावेळी चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे काल मोठ्या संख्येने चाहचे स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले.
धोनीने काल चेन्नई सुपर किंग्सच्या काही अन्य खेळाडूंबरोबर सराव केला. यावेळी त्याने काहीवेळासाठी जॉगिंग आणि स्ट्रेचिंग केले. त्यानंतर तो पॅड घालून नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावासाठी आला. त्याने नेट्समध्ये मोठे फटकेही मारले. या सरावादरम्यानचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केला आहे. यामध्ये चाहते ‘धोनी..धोनी’, असे ओरडताना ऐकू येत आहे.
A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining 🦁💛 pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020
धोनीने जुलै 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे जवळजवळ 8 महिन्यांनी धोनीला मैदानावर चाहत्यांना पहायला मिळाले आहे.
ROAR your whistles loud and clear🥳
Thala MS Dhoni is back in action after a long wait of 264 days!💛🦁#WhistlePodu #Yellove @ChennaiIPL pic.twitter.com/jCuoKo6ca5
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) March 2, 2020
धोनी रविवारी (1 मार्च) चेन्नईमध्ये पोहचला होता. त्यावेळीही त्याचे जोरदार स्वागत झाले. या स्वागताचा व्हिडिओही चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला होता.
यात दिसते की धोनीला चाहत्यांनी गराडा घातला आहे. तसेच धोनीसमवेत चेन्नई सुपर किंग्सचे संघ व्यवस्थापक रसेल राधाक्रिष्णन देखील आहेत. यावेळी धोनीला पिवळ्या फुलांचा पुष्पगुच्छही देण्यात आला. त्याचबरोबर धोनीने हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर सर्व गोष्टींची पहाणी केली.
Every goose shall bump with First Day First Show feels! Just #StartTheWhistles! #HomeSweetDen 🦁💛 pic.twitter.com/DpQBIqahZe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 1, 2020
धोनीबरोबरच चेन्नई सुपर किंग्सचे अन्य काही खेळाडूही चेन्नईला पोहचले आहेत. यात अंबाती रायडू, पियुष चावला, कर्ण शर्मा, सुरेश रैना या खेळाडूंचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण ट्रेनिंग कॅम्पला 19 मार्चपासून सुरुवात होईल. त्यावेळी संघातील सर्व खेळाडू एकत्र येतील.
धोनीने मागील 8 महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे धोनीच्या भविष्याबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा होत आहे.
असे असले तरी आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर्षीच्या आयपीएल 2020 मध्ये 29 मार्चला वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला सामना पार पडणार आहे. या सामन्यातून धोनी जवळजवळ 8 महिन्यांनी क्रिकेट सामना खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का
–तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या त्या खेळाडूला रोहित शर्माने केला हा मेसेज
–“भारतासारख्या जागतिक दर्जाच्या संघाला पराभूत करून समाधान वाटले”