कोरोना व्हायरसमुळे जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे ते घरातच काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत.
क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीनेही (MS Dhoni) मागील काही महिन्यांपासून पबजी खेळ (PUBG) खेळायला सुरुवात केली होती. परंतु धोनी आता पबजी गेम खेळत नसल्याचे त्याच्या संघसहकाऱ्याने सांगितले आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) खुलासा केला आहे की, धोनीला पबजी हा खेळ चांगल्याप्रकारे खेळता येत नाही. त्यामुळे तो आता दुसरा कोणता तरी गेम खेळत आहे.
आयपीएलमधील फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चाहरने म्हटले आहे की, “माही भाई आता पबजी खेळत नाही. परंतु मी आताही पबजी खेळतो. माही आता दुसरा खेळ खेळतो. एकदा तो पबजी खेळण्यासाठी आला होता, तेव्हा त्याला हा खेळ खेळता आला नाही. त्याला समजतच नव्हते की कोण कुठून येऊन आक्रमण करत आहे.”
In the inaugural episode of #AnbuDenLions, namma #Cherry got talking about playing PUBG with #Thala Dhoni and why guys love to learn the guitar! #WhistlePodu @deepak_chahar9 @RuphaRamani ???????? pic.twitter.com/xDo6SFYiLe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 7, 2020
भारतीय संघातील केदार जाधवने (Kedra Jadhav) सर्वप्रथम हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने इतर संघसहकाऱ्यांना हा खेळ खेळायला शिकवले. पबजी हा खेळ नियमितपणे खेळणाऱ्या भारतीयांमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या खेळाडूंचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३ भारतीय क्रिकेटर, ज्यांच्या नाव आहे गिनेस वर्ल्ड रिकॉर्डमध्ये
-न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पाणी पाजणारे ३ भारतीय कर्णधार
-विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू म्हणतो, धोनीपेक्षा गंभीर भारी कर्णधार





