Shahabaz Ahmed Century: आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी अनेक संघांनी मोठे निर्णय घेतले. काही संघांनी आपल्या खेळाडूंना रिलीज केले, तर काहींनी अनेक खेळाडू दुसऱ्या संघांशी ट्रेड केले. त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने शाहबाज अहमद याला सनरायझर्स हैदराबाद संघाशी ट्रेड करून सर्वांना धक्का दिला होता. शाहबाजच्या बदली आरसीबीने अनकॅप्ड मयंक डागर या खेळाडूला ताफ्यात घेतले होते. आता आरसीबीला या निर्णयाचा पश्चाताप होत असावा. कारण, याच शाहबाजने आरसीबीला सडेतोड प्रत्युत्तर देत विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शानदार शतक ठोकले आहे.
शाहबाजचे शतक
सोमवारी (दि. 11 डिसेंबर) हरियाणा विरुद्ध बंगाल (Haryana vs Bengal) संघात विजय हजारे ट्रॉफी 2023 (Vijay Hazare Trophy 2023) स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed Century) याने शतक झळकावले. त्याच्या या खेळीने बंगाल संघाला अडचणीतून बाहेर काढले. 93 धावसंख्येवर बंगालचा निम्मा संघ बाद झाला होता. त्यानंतर शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) याने डाव सांभाळला आणि 118 चेंडूत 100 धावांची महत्त्वपूर्ण शतकी खेळी केली. त्यानंतर बंगालने 50 षटकात 10 विकेट्स गमावत 225 धावा केल्या. या खेळीने शाहबाजने आरसीबी (RBC) संघाला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, 11 डिसेंबर रोजी शाहबाज त्याचा 29वा वाढदिवसही साजरा करत आहे.
A fantastic fighting 💯 from Shahbaz Ahmed 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/Ife9ABthHS#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6SadrpZ0ES
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2023
आरसीबीने केली मोठी चूक?
शाहबाजने शतक ठोकताच ट्रोलर्सने त्याचा माजी संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर (Royal Challengers Bangalore) निशाणा साधला. एका युजरने बीसीसीआय डॉमेस्टिकचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “पुन्हा आरसीबीची थट्टा उडणार आहे की, त्यांनी या खेळाडूला रिलीज केले.” यापूर्वी अशीही चर्चा होती की, आरसीबीने हेजलवूड, शाहबाजसारख्या खेळाडूंना सोडून मोठी चूक केली आहे.
Shahbaz Ahmed – 100 (118).
Next best – 24 (41).One of the best innings in the Quarter Final of Vijay Hazare Trophy by Shahbaz…!!!pic.twitter.com/pO2bILZvhf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 11, 2023
शाहबाजची कामगिरी
शाहबाज एक-दोन नाही, तर 4 वर्षे आरसीबीचा भाग होता. त्याला आयपीएल 2020मध्ये आरसीबीने 20 लाख रुपयात आपल्या ताफ्यात जोडले होते. त्यानंतर 2021मध्येही त्याच किंमतीत तो संघाचा भाग राहिला. त्यानंतर 2022मध्ये एकदम त्याचे प्रमोशन झाले आणि फ्रँचायझीने 2 कोटी 40 लाख रुपये म्हणजेच 12 पट जास्त पैसे देऊन त्याला रिटेन केले. 2023मध्येही तो आरसीबीचा भाग होता, पण आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेसाठी आरसीबीने त्याला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाशी ट्रेड केले.
शाहबाजने आयपीएलमध्ये आतापर्यंत 39 सामने खेळताना 14 विकेट्स घेतल्या. तसेच, 321 धावाही केल्या. या आकडेवारीवरून त्याची प्रतिभा ठरवली जाऊ शकत नाही, पण तो एक खूपच खास आणि शानदार खेळाडू आहे. त्यामुळे त्याची भारतीय संघातही एन्ट्री झाली होती. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, आरसीबीला त्याची उणीव किती भासते, पण शाहबाज संघात आल्याने हैदराबादचा आनंद गगनात मावेनासा झाला असावा. (did rcb make major mistake shahbaz ahmed century vijay hazare trophy 2023)
हेही वाचा-
मधला स्टम्प उडला, पण बेल्सने सोडली नाही जागा! मैदानी पंचही पडले गोंधळात, तुम्हीच सांगा Out की Not-Out
कांगारूच्या खेळाडूची मोठी मजल! सहकारी अन् भारतीय दिग्गजाला पछाडत ICCचा खास पुरस्कार केला नावे