भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक ओळखला जातो. जेव्हा तो त्याच्या लईत फलंदाजी करत असतो, तेव्हा अनेकदा गोलंदाजांवर दबाव असतो. तसेच तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत संघाला जिंकण्याचा विश्वासही असतो. धोनी जेव्हा त्याच्या उत्तम फॉर्ममध्ये होता, तेव्हा अनेक गोलंदाजांना त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना संघर्ष करावा लागला आहे. पण नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने धोनीबद्दल आश्चर्यकारक खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किएने धोनीला पहिल्यांदा चॅम्पियन्स लीग २०१० मध्ये नेटमध्ये गोलंदाजी केली होती, तेव्हा त्याला वाटले होते की धोनीला फलंदाजी येत नाही.
नॉर्किएने ‘द ग्रेड क्रिकेटर्स’ यू ट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की ‘मला आठवते की मी नेट्समध्ये धोनीला गोलंदाजी करत होतो. त्याला पाहून वाटत नव्हते त्याला नेट्समध्ये फलंदाजी करण्याची इच्छा आहे. त्याला पाहून वाटले नव्हते की तो फलंदाजी करु शकतो. खरं सांगू तर मला माहित नव्हते तो धोनी आहे. त्याने काही चेंडू उभ्याउभ्याच खेळले आणि त्याचे पायपण हलत नव्हते. मला वाटले की त्याला प्रत्येक चेंडू रोखायचा आहे. पण नंतर तो सर्वांशी चांगले वागला आणि सर्वांना भेटला.’
धोनीच्या नेतृत्त्वाखाली २०१० साली चेन्नई सुपर किंग्सने चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी नॉर्किए फारसा कोणाला माहित नव्हता. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेमधील स्थानिक संघ वॉरियर्सला पराभूत करुन चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.
सध्या नॉर्किए देखील आयपीएलमध्ये खेळतो. तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग असून त्यांच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज आहे. तसेच नॉर्किए दक्षिण आफ्रिका संघातीलही प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याला यावर्षीचा दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील महिन्यात भारतीय संघ जाणार श्रीलंका दौऱ्यावर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…