भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी नववर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने संघात २ महत्त्वपुर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये चालू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील आतापर्यंत २ सामने संपले आहे. यातील ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला. तर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने मिळवला. यासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.
मयंक आणि विहारीला करावे संघाबाहेर
मेलबर्न येथे झालेल्या ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पूर्ण भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले. परंतु सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल आणि मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी यांना सलग दुसऱ्या सामन्यात मोठ्या आकडी धावा करण्यात अपयश आले. त्यामुळे वेंगरसकर यांचे म्हणणे आहे की, तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांच्याजागी दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात यावी.
वेंगसरकर म्हणाले की, “शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा बॉक्सिंग डे कसोटी सामना त्याचा पदार्पणाचा सामना असूनही प्रभावी फलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात फलंदाजी करताना त्याच्यातील कौशल्य जगाला दाखवून दिले. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळालीच पाहिजे. याउलट अगरवालला संघातून बाहेर करून त्याच्या जागी रोहित शर्माला संधी द्यावी. तर विहारीच्या जागी केएल राहुलला संघात सामील करण्यात यावे.”
“राहुल गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा सहभाग संघासाठी फायद्याचा ठरेल. दुसरीकडे अगरवालमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे मला जाणवत आहे. अशात त्याच्याऐवजी रोहित संघात सहभागी झाला; तर त्याची फलंदाजी आणि रहाणेचा फॉर्म मिळून भारतीय संघाला अजून जास्त मजबूत बनवेल,” असे शेवटी बोलताना वेंगसरकर यांनी सांगितले.
सिडनीत रंगणार तिसरा कसोटी सामना
पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान तिसरा कसोटी सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या या सामन्यातील विजेता संघ मालिकेत २-१ ने आघाडी घेईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! इंग्लंडच्या ‘या’ दोन माजी अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर केला वर्णभेदाचा आरोप
“सिडनी कसोटीत रोहितसोबत शुबमन नव्हे तर ‘याने’ करावी ओपनिंग”, सुनील गावसकरांनी सांगितले नाव
‘हाय गर्मी ‘ म्हणत मोहम्मद शमीच्या पत्नीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ