नवी दिल्ली | आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला सात सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवून देणारा कर्णधार दिनेश कार्तिकने शुक्रवारी (16 ऑक्टोबर) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने केकेआरचे नेतृत्व केले.
कार्तिकने म्हटले होते की फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यासाठी कर्णधारपद सोडले आहे. असे असले तरीही ही गोष्ट क्रिकेटप्रेमींपासून ते क्रिकेटतज्ज्ञांपर्यंत कुणालाच पचलेली दिसत नाही. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही कार्तिकने कर्णधारपद सोडण्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.
खेळाडूंवर येतो दबाव
शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर सुरु असलेल्या एका कार्यक्रमात दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्याबद्दल चर्चा सुरु होती. कर्णधारपद सोडल्यामुळे संघावर परिणाम होतो का? या प्रश्नाला उत्तर देताना इरफान पठाण म्हणाला की, “अर्थातच, खेळाडूंवर खूप दबाव येतो. संघात खराब वातावरण निर्माण होते. खेळाडूंना काय करायचं तेच कळत नाही.”
प्रशिक्षकाला मॉर्गन वाटला असेल अधिक चांगला
दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्याच्या प्रकरणात इरफान पठाणने परदेशी प्रशिक्षकाचा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला की, “केकेआरचा प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्यूलम आहे. तो विदेशी आहे. कर्णधार म्हणून ऑयन मॉर्गन त्याला अधिक चांगला वाटला असेल. त्यामुळे विदेशी खेळाडू असलेल्या मॉर्गनला कर्णधारपद मिळाले. जर भारतीय प्रशिक्षक असता तर त्याने हा निर्णय कदाचित घेतला नसता.”
सामनावीर ठरला होता कार्तिक
दिनेश कार्तिकने सहा दिवसांपूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले होते. इरफान पठाणने त्याच्या या कामगिरीचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला की “केकेआरचे सात सामन्यांमध्ये 8 गुण आहेत .संघ अद्यापही चांगल्या स्थितीत आहे. जर संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला असता तर दिनेश कार्तिकला सर्वात जास्त श्रेय मिळाले असते. लक्षात ठेवा की यापूर्वी एका सामन्यात कार्तिक सामनावीर ठरला होता.”
कार्तिकने या हंगामात केल्या 108 धावा
दिनेश कार्तिकने या हंगामात 7 डावात 108 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएल 2020 मध्ये केकेआरने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. सध्या संघ गुणतालिकेत 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिनेश कार्तिक आणि केकेआर संघ, अशी होती गेल्या २ वर्षांतील आकडेवारी
-मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
-रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे राग आला होता, दिनेश कार्तिकने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून
-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी