आयपीएल २०२२ मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकला भारतीय संघात संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याने दमदार खेळी केली. तिसऱ्या सामन्यात त्यांना अपयश आले आणि आता चौथ्या सामन्यासाठी संघ राजकोटला पोहोचला आहे. तीन सामन्यांनंतर पाहुणा संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. भारतीय संघाला मालिकेत टिकायचे असेल तर चौथा टी२० सामना जिंकावा लागेल.
दिनेश कार्तिकचा व्हिडिओ व्हायरल
याच दरम्यान दिनेश कार्तिकने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक धुराच्या मधूनच एंट्री घेत आहे. हा व्हिडिओ विमानातील असून यामध्ये भारतीय संघाचे इतर खेळाडूही बसले असून सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले की, ‘तोंडी परिक्षेच्या रूममधून बाहेर येत असलेला रोल नंबर एक’. चाहते कार्तिकचा हा व्हिडिओ शाहरुख खानसोबत जोडत आहेत. किंग खानने त्याच्या ‘रईस’ चित्रपटात अशीच एन्ट्री केली होती. मात्र, कार्तिकने शाहरुख खानच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.
https://www.instagram.com/reel/Ce2ygHpIT6s/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीच्या जोरावर टी२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी मांडली आहे. त्याने गेल्या आयपीएल हंगामात १८३.३३ च्या स्ट्राइक रेटने आणि ५५ च्या सरासरीने ३३० धावा केल्या. कार्तिक १६ डावात फलंदाजीला आला आणि गोलंदाज त्याला फक्त ६ वेळा बाद करू शकला. त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी आयपीएलमधील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास विश्वचषक खेळणे जवळपास निश्चित होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अर्शदीप डेथओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो’, आशिष नेहराने टीम इंडियाला दिल्ला मोलाचा सल्ला
‘चहलला टी२० विश्वचषकासाठी संघात घेऊ नये!’, भारताच्या माजी दिग्गजाने सांगितले कारण
‘तो एखादा सामन्यांत चालतो प्रत्येकवेळी नाही’, भारताच्या यष्टीरक्षकावर कपिल देव नाराज