भारतीय संघाचा चाइनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन केले. त्याने जवळपास दोन वर्षांनंतर या संघात पुनरागमन केले असून त्याचे प्रदर्शन देखील कौतुकास्पद होते. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली गेली होती. पण दुसऱ्या कसोटीतून त्याचे नाव वगळले गेले. याच पार्श्वभूमीवर दिनेश कार्तिक याने कुलदीपचे समर्थन केले होते. मात्र कुलदीपचे समर्थन करणे कार्तिकला महागात पडल्याचे दिसत आहे.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. असे असले तरी, या मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यातून कलदीपला वगळले. कुलदीपला संधी न दिल्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांवर जोरदार टीका झाल्या, तर दुसरीकडे कुलदीपचे मात्र कौतुक होत राहिले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) देखील कुलदीपच्या समर्थनार्थ पुढे आला होता. पण कुलदीपचे लहानपणीचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी कार्तिकला आरसा दाखवण्याचे काण केले आहे.
कपिल पांडे यांच्या मते कार्तिक आता कुलदीपचे कौतुक करत आहे, पण जेव्हा कोलकाता नाईट रायडर्समध्ये कुलदीप खेळत होता, तेव्हा मात्र कार्तिकने त्याला संधी दिली नव्हती. दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर कार्तिकने कुलदीप त्याचा आवडता गोलंदाज असल्याचे बोलून दाखवले होते. पण कपिल पांडेंच्या मते कार्तिकच्या नेतृत्तावतच त्याला संधी मिळाल्या नाहीत. कपिल पांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “जेव्हा कुलदीप केकेआरसाठी खेळायचा आणि कार्तिक संघाचा कर्णधार होता, तेव्हा तो कुलदीपकडून दोन षटके गोलंदाजी करून घ्यायचा. पण आज तोच म्हणत आहे की, कुलदीप माझा आवडते गोलंदाज आहे. असे आहे तर त्याला तेव्हा का खेळवले नाही? त्याला खेळवले पाहिजे होते. आज ही गोष्ट घडून गेली आहे आणि कुलदीपचे भविष्य खूप मोठे आहे, असे मला वाटते.”
2022 मध्ये कुलदीप यादवचे चमकदार प्रदर्शन
दरम्यान, कुलदीप यादनवे आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी चमकदार प्रदर्शन करत सर्वांना प्रभावित केले होते. त्याआधी आयपीएल 2020 मध्ये त्याने केकेआरसाठी पाच सामने खेळले होते, तर 2021 हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. असे असले तरी, मागच्या आयपीएल हंगामात त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आणि भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा ठोठावले. (Dinesh Karthik in trouble for praising Kuldeep Yadav.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटकडून 2023 मध्ये प्रशिक्षकांना आहे ‘ही’ अपेक्षा; म्हणाले, “वनडेत 50…”
आनंदाची बातमी: रिषभला आयसीयुच्या बाहेर हलवले! उपचारांना देतोय चांगला प्रतिसाद