भारतीय क्रिकेट संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर संघाच्या नेतृत्वात बदलाची चर्चा सातत्याने होते. इतकेच नव्हेतर विश्वचषकानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा हा टी20 सामने खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला दोन वेगळे कर्णधार मिळाले असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संघाचा वरिष्ठ यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यान महत्त्वाचे वक्तव्य केले.
दिनेश कार्तिक हा नुकताच एका क्रिकेट संकेतस्थळावर बोलत होता. यावेळी त्याने संघाच्या दोन कर्णधार या संकल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,
“अगदी परिस्थिती बनली तर संघाचे एकावेळी दोन कर्णधार बनवण्यात येऊ शकतात. मात्र, आत्ता तरी मला त्याची गरज वाटत नाही. त्याचे पहिले कारण म्हणजे यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या काळात आपल्याला फक्त तीन टी20 सामने खेळायचे आहेत. एकदा विश्वचषक संपल्यानंतर याबाबत निर्णय घेणे योग्य ठरेल.”
तो पुढे म्हणाला,
“रोहित विश्वचषकात काहीतरी खास कामगिरी करू न शकल्यास दोन वेगळ्या कर्णधारांबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो. मात्र, रोहितची कामगिरी चांगली झाली तर, त्याची इच्छा असल्यास त्याला 2024 टी20 विश्वचषकापर्यंत खेळवावे लागेल.”
भारताला टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर भारताने तीन टी20 मालिका खेळल्या आहेत. या सर्व मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या हाच करताना दिसला. त्यामुळे बीसीसीआयने आगामी टी20 विश्वचषकाचा विचार सुरू केल्याचे दिसत आहे. टी20 संघात सध्या एकही वरिष्ठ खेळाडू खेळत नाही.
(Dinesh Karthik Talks About Split Captaincy Of Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई सिटी एफसीचा रेकॉर्ड! सलग 16 सामन्यांत अपराजित अन् मोडला सर्वाधिक गोल्सचा विक्रम
सेव्हन अ साईड फुटबॉल | स्ट्रायकर्स १३ वर्षांखालील गटातून अंतिम फेरीत