दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वात वयस्कर आणि वरिष्ठ खेळाडू आहे. त्याने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup)खेळणाऱ्या संघात त्याला एका फिनिशरच्या भुमिकेत सामील केलेलं आहे. कार्तिकची ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते अशी संभाव्यता वर्तवली जाते. ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या विश्वचषकात आपल्या मुलाला फिनिशरच्या भुमिकेत बघण्यासाठी त्याचे वडील कृष्ण कुमार देखील तिथे पोहचले आहेत.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जास्त फलंदाजी करू शकला नाही. तो शेवटच्या षटकात आला, मात्र लवकर बाद होऊन तंबूत परतला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्या दमदार खेळीमुळे भारताला विजय प्राप्त झाला. त्यानंतर कार्तिकने देखील मैदानात धूमधडाक्यात जल्लोष साजरा केला. विराट आणि हार्दिकसोबत तो देखील प्रेक्षकांना अभिवादन करत होता आणि टाळ्या वाजवतं प्रेक्षकांचा उत्साह वाढवताना दिसला.
मुलाचं प्रदर्शन बघण्यासाठी पोहचले ऑस्ट्रेलियात
कार्तिकचे वडील कृष्ण कुमार सिडनीत पोहचले आहेत आणि सराव करणाऱ्या भारतीय संघाची एका कोपऱ्यात उभं राहून वाट बघत होते. कार्तिकचे वडील आपल्या मुलाला टी20 विश्वचषकात भारतासाठी फिनिशरच्या भुमिकेत खेळताना बघण्यासाठी आतूर असल्याने ते येथे आले आहेत. भारतीय संघाचा सराव चालू असताना कृष्ण कुमार कोणत्याही एका विशिष्ट फलंदाजाकडे बघतं नव्हते. एकदा जेव्हा त्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरु केला तेव्हा त्यांना अडवण्यात आले. यावर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही याचा वापर करू शकतं नाही, असे करणे नियमांचं उल्लंघन मानले जाते.
जेव्हा कार्तिक कसोटी खेळायचा तेव्हा त्याची आई सामना बघायला जायची
जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना समजले की ते दिनेश कार्तिकचे वडील आहेत, तेव्हा सर्वजण त्यांच्या जवळ पोहचले. आपल्या मुलाच्या पुनरागमनाबाबत बऱ्याच यूट्यूब चॅनल्सशी संवादही साधला. कार्तिक असा खेळाडू आहे की तो जेव्हा पण भारतासाठी खेळतो त्याचे आई-वडील त्याचा खेळ बघण्यासाठी तिथे उपस्थित असतात. कार्तिक जेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी सामना खेळत होता तेव्हा त्याची आई पद्मिनी नेहमी त्याचा सामना बघण्यासाठी यायची.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीला येण्याआधी कार्तिकला कोसले मग…! शेवटच्या चेंडूची कहानी अश्विनकी जुबानी
“अर्शदीप झहीरप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी योगदान देईल”; माजी कर्णधाराने व्यक्त केला आशावाद