स्पेनला हरवून विश्वचषकात शानदार सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही. यजमान संघाचा इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. या सामन्यादरम्यान उभय संघांमध्ये थरारक लढत झाली. मात्र, दोन्ही संघांना गोल करता आला नाही. सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांना विभागून गुण देण्यात आले. हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर आता ड गटातील उपांत्यपूर्व फेरीची शर्यत आता रंजक होऊ शकते.
𝐅𝐮𝐥𝐥-𝐓𝐢𝐦𝐞: 𝐄𝐧𝐠𝐥𝐚𝐧𝐝 𝟎-𝟎 𝐈𝐧𝐝𝐢𝐚
There is no separating England and India as the two long-time rivals play out a hugely entertaining draw in the second game of the day in Pool D. #HWC2023
📱- Download the @watchdothockey app to follow all the updates. pic.twitter.com/wARP6Bv22w
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 15, 2023
ओडिशा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारत व इंग्लंड यांनी आपले पहिले सामने जिंकत या सामन्यात प्रवेश केला होता. भारताने स्पेनचा 2-0 व इंग्लंडने वेल्सचा 7-0 असा मोठा पराभव केलेला. आपल्या दुसऱ्या सामन्यात या दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये इंग्लंडला सात तर भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, दोन्ही संघ याचा फायदा घेऊ शकले नाहीत. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने संधी निर्माण केल्या मात्र त्यांच्या पदरी पुन्हा अपयश पडले. चौथ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदास व जर्मनप्रीत यांना ग्रीन कार्ड मिळाल्याने भारतीय संघाला नुकसान सोसावे लागले. परिणामी, दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले.
भारत आणि इंग्लंड यापूर्वी बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत समोरासमोर आले होते. हा सामना देखील 4-4 असा बरोबरीत सुटलेला. दिवसातील दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि वेल्स आमने-सामने आले. यामध्ये स्पेन संघाने 5-1 असा विजय मिळवत आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखले. तर, सलग दोन पराभवामुळे वेल्स स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.
(Dramatic Draw Between India And England In Hockey World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण