---Advertisement---

धवन नाही तर ‘या’ खेळाडूला देऊ सामनावीराचा पुरस्कार, श्रेयस अय्यरने दिली प्रतिक्रिया

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 3:59 PM
---Advertisement---

शारजाह | आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. सामन्यादरम्यान चेन्नईच्या खेळाडूंनी धवनचे दोन झेल सोडले. धवनला मिळालेले जीवदान आम्हाला महागात पडले असे धोनीने सांगितले.

खेळपट्टी फलंदाजीसाठी होती अनुकूल

सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, “शिखर धवनची विकेट खूप महत्वाची होती पण आमच्या खेळाडूंनी त्याचे दोन झेल सोडले. फलंदाजीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट उत्तम होता. दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती त्यामुळेच दिल्लीने आमच्यापेक्षा 10 धावा अधिक केल्या.”

शतक झळकावल्यामुळे झाला आनंद

उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर धवन म्हणाला की, “आयपीएलच्या 13 वर्षाच्या इतिहासात प्रथमच शतक झळकावल्यामुळे आनंद झाला. मी 13 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. मी हंगामाच्या सुरूवातीपासूनच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो पण मोठी खेळी खेळण्यात मला अपयश येत होते.”

पूर्वीपेक्षा आहे तंदरुस्त

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी मानसिकदृष्ट्या सकारात्मक होतो आणि धावा काढण्याचा प्रयत्न करत होतो. मी आता पूर्वीपेक्षा तंदुरुस्त आहे. मी वेगाने धाव घेत असून खूप उत्साही आहे.”

ड्रेसिंग रूममध्ये बसून घाबरलो होतो

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “मी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो आणि नर्वस होतो. पण धवन शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिल्यास संघ विजयी होईल हे मला माहित होते.”

अक्षरला देऊ सामनावीराचा पुरस्कार

दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलने शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज असताना 3 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. अक्षरच्या खेळीबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, “अक्षरने मैदानात उतरल्यानंतर ज्या प्रकारे तीन षटकार ठोकले ते दृश्य अप्रतिम होतं. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सामनावीराचा पुरस्कार अक्षरला देऊ.”

अक्षरने तीन षटकारांच्या मदतीने पाच चेंडूंत नाबाद 21 धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याने चार षटकांत फक्त 23 धावा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: जेव्हा पंत, स्टॉयनिसने काढली रिकी पाँटिंगची खोड, पुढे काय झालं पाहा

“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली

IPL 2020 : ‘गब्बर’चे वादळी शतक, थरारक सामन्यात दिल्लीकडून चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव

ट्रेंडिंग लेख –

पिच्चर अभी बाकी हैं! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, कसे ते घ्या जाणून

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---