दुलिप ट्रॉफी 2024 ची सुरुवात 5 सप्टेंबर रोजी झाली. या स्पर्धेत चार संघ एकमेकांसमोर आले आहेत. भारत अ आणि भारत ब संघांचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर, तर भारत क आणि भारत ड संघाचा सामना आंध्र प्रदेशात खेळवला जात आहे. भारत अ संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या फलंदाजीमुळे किंवा कर्णधारपदामुळे नव्हे तर, त्याच्या जर्सीमुळे प्रकाशझोतात आला. त्याच्या जर्सीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
शुबमन दुलिप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याच्या जर्सीच्या मागील बाजूस टेप लावून खेळतोय. गिलने सामन्यादरम्यान टेप केलेली जर्सी का घातली? असा प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. असे मानले जात आहे की, गिल इतर खेळाडूची जर्सी घालून खेळत असेल. गिलच्या जर्सीचा क्रमांक 77 आहे. काहींनी त्याची जर्सी फाटल्याचे देखील म्हटले होते.
गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नेहमी 77 क्रमांकाची जर्सी घालून उतरतो. भारतीय संघात पदार्पण करण्याआधी त्याने काही वेळा 7 क्रमांकाची जर्सी देखील घातल्याचे दिसून आलेले. याच क्रमांकाचे जर्सी दुलिप ट्रॉफीसाठी उपलब्ध नसल्याने त्याला, आपल्या जर्सीवर टेप लावावी लागली.
Shubman Gill departs with a beauty of a delivery from Navdeep Saini pic.twitter.com/eflzDSBfD7
— psyf (@PsyfeR888) September 6, 2024
दुलिप ट्रॉफीच्या या सामन्याचा विचार केल्यास भारत ब संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या डावात 321 धावा बनवल्या. मुशीर खान याने शानदार 181 धावांची खेळी केली. त्याला नवदीप सैनी याने अर्धशतक करून साथ दिली. त्यानंतर भारत अ संघासाठी सलामीवीर गिल हा अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याने 43 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. नवदीप सैनी याने त्याचा त्रिफळा उडवला. आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याच्यासाठी या सामन्यातील दुसरा डाव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा –
विराट कोहली जगातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू! जाणून घ्या मेस्सी-रोनाल्डोपेक्षा किती मागे
उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर