नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. तरीही काही देशांमध्ये खेळ सुरु झाले आहेत. खेळ तर सुरु झाले आहेतच परंतु लोक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.
असे असले तरीही दक्षिण कोरियाच्या एफसी सियोलवर (FC Seoul) कोरोनामुळे (Corona Virus) रिकाम्या मैदानामध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या बसण्याची जागा भरण्यासाठी आयोजकांनी निवडलेल्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच अशाप्रकारच्या पर्यायामुळे जगभरातील क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला असून जगभरातून जोरदार टीका होत आहे.
https://twitter.com/WhoAteTheSquid/status/1262068981546000386
खरंतर आयोजकांनी रिकाम्या जागा भरण्यासाठी ‘सेक्स डॉल’ चा (बाहुल्या) वापर केला आहे. त्यामुळे यामागील त्यांचा उद्देश कोणालाही समजला नाही. परंतु यामुळे आयोजकांना त्रास सहन करावा लागला आहे. एफसी सियोलवर स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून ‘सेक्स डॉल’चा (Sex Doll) वापर केल्यामुळे १० करोड वोन म्हणजेच ८१ हजारपेक्षा अधिक डॉलर्सचा दंड लावण्यात आला आहे.
देशाच्या अव्वल लीगच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, या फुटबॉल क्लबने महिला चाहत्यांचा अपमान केला आहे. क्लबच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंट्सवरदेखील याबाबतीत पोस्ट केल्या आले आहे. क्लबने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरदेखील माफी मागत म्हटले की, लीगच्या १७व्या सामन्यादरम्यान झालेल्या चूकीबद्दल आम्ही माफी मागतो.
कोरोना व्हायरसमुळे स्टेडियममध्ये चाहत्यांवर लागलेल्या बंदीमुळे एफसी सियोलने रविवारी (१७ मे) सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये खूप साऱ्या ‘सेक्स डॉल’ (बाहुल्या) ठेवल्या होत्या. या बाहुल्यांना टीशर्ट घालण्यात आले होते. तसेच त्यांच्या हातात प्लेकार्ड होते.
सध्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनीदेखील क्लबवर टीका केल्या आहेत. काही चाहत्यांचे असे मत आहे की, क्लबने हे मुद्दाम केलेले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…