वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने टी-10 क्रिकेट बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जर हा फॉरमॅट खेळला गेला तर मग यामुळे क्रिकेटपटूंची कारकीर्द मोठी होवू शकते. त्यामुळे ते खूप दिवस खेळू शकतात. ड्वेन ब्राव्हो म्हणाला ज्या प्रकारे टी-20 फॉरमॅटचे क्रिकेट आल्याने क्रिकेटचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले होते. त्याप्रमाणे टी-10 फॉरमॅटने सुद्धा खूप परिणाम होणार आहे.
ड्वेन ब्राव्हो वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याचबरोबर त्याला मर्यादित षटकांच्या फॉरमॅट खूप यश मिळाले आहे. त्याच्याजवळ टी-20 फॉरमॅटच्या क्रिकेटचा गाढा अनुभव आहे. तसेच अबुधाबी येथे आयोजित केल्या जाणार्या टी-10 लीग मध्ये ही तो सहभागी होत असतो.
टी-10 फॉरमॅट लोकांना आकर्षित करेल
अबुधाबी येथे आयोजित केल्या जाणार्या टी-10 लीग फॉरमॅट मध्ये ड्वेन ब्राव्हो मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत तीन हंगामात या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता ड्वेन ब्राव्हो चौथ्या हंगामात दिल्ली बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. दिल्ली बुल्स संघाने यंदाच्या हंगामासाठी ड्वेन ब्राव्होची कर्णधार म्हणून निवड केली आहे.
टी-10 फॉरमॅट बद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला, “टी-10 फॉरमॅट खूप रोमांचक स्पर्धा आहे आणि ही त्या प्रकारची आहे, ज्या प्रकारे काही वर्षापूर्वी टी-20 क्रिकेटची सुरुवात झाली होती. मार्केट मध्ये टी-20 फॉरमॅटने लोकांना आकर्षित केले होते. त्याचबरोबर पूर्ण जगातील लोकं याकडे ओढली गेली. माझ्या हिशोबाने टी-10 फॉरमॅट सुद्धा असे करू शकतो. या व्यतिरिक्त माझ्या हिशोबाने याने जे वरीष्ठ खेळाडू आहेत. ते खूप कालावधी पर्यंत खेळू शकतील.”
ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली मराठा अरेबियन्स संघाने टी-10 फॉरमॅट लीग मध्ये किताब जिंकला आहे. ड्वेन ब्राव्होने चार सामन्यात 3 विकेट्स घेत 31 धावा सुद्धा केल्या होत्या. ड्वेन ब्राव्होने मराठा अरेबियन्स संघासाठी 17 सामन्यात 64 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये त्याने 18 विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
सिडनीच्या मैदानावर शेरेबाजीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात
रोहित बाद झाल्याने आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांची प्रतिक्रिया