सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करणारा फिरकी गोलंदाज राशिद खान याला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. प्रत्येक हंगामात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या या गोलंदाजाला यंदा गडी बाद करण्यासाठी संघर्ष करताना दिसला होता. त्यानंतर भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. अशातच राशिद खानने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जी पाहून ड्वेन ब्रावो देखील आश्चर्यचकित झाला आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच ती केव्हा होणार याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. राशिद खान देखील अफगाणिस्तानमध्ये आपल्या घरी पोहोचला आहे. घरी परतल्यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधे तो आपल्या घरात उभा आहे. राशिदने या फोटोवर कॅप्शन म्हणून,”जुम्मा मुबारक” असे लिहिले आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हे घर मोठ्या राजवाड्यापेक्षा कमी वाटणार नाही.
https://www.instagram.com/p/COkfZjxBZym/?igshid=17zuoen51kicj
राशिद खानने शेअर केलेल्या या फोटोला ४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच या फोटोवर अनेक चाहत्यांच्या आणि क्रिकेटपटूंच्या मजेशीर प्रतिक्रीया देखील येत आहेत. परंतु ड्वेन ब्रावोने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने या फोटोवर प्रतिक्रीया देत विचारले की, “वाह भाई.. हे तुझे घर आहे की हॉटेल, सुरक्षित राहा माझ्या मित्रा.”
सनरायझर्स हैदराबाद संघाची निराशाजनक कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. सुरुवातीच्या ६ सामन्यात डेविड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले होते. परंतु त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश येत होते. त्यामुळे ७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या संघ व्यवस्थापकांनी त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याऐवजी केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आले होते. सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत २ गुणांसह तळाशी होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जगप्रसिद्ध मॉडेलच्या जाळ्यात अडकला ‘हा’ केकेआरचा धुरंधर, एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन






