---Advertisement---

इंग्लंडमध्ये होणार आयपीएलचे आयोजन? बोर्डाने दिली ‘ही’ माहिती

On: शुक्रवार, मे 21, 2021 10:53 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच माहिती दिली आहे की, आयपीएल 2021 स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भारत व इंग्लंड मधील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक बदलण्यासाठी बीसीसीआयने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही. ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याची इच्छा आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डांने स्पष्ट केले की, मूळ वेळापत्रक पाळण्याची त्यांची योजना आहे, कारण बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एक प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही नियमितपणे बीसीसीआयशी मालिकेच्या मुद्द्यांविषयी चर्चा करत आहोत. विशेषता कोरोनाच्या संदर्भात हे महत्त्वाचे आहे. बीसीसीआयने मालिकेचे वेळापत्रक बदलण्याबाबत कोणतीही अधिकृत विनंती केलेली नाही आणि आम्ही 5 सामन्यांची मालिका नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच आयोजित करणार आहोत.”

इंग्लंडचे माजी कर्णधार आणि क्रिकेट लेखक मायकेल अ‍ॅथर्टन यांनी ‘टाइम्स’ मधील आपल्या लेखात लिहिले आहे की, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 5 कसोटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता विचारली आहे. याबाबत बीसीसीआयशी संपर्क साधला असता, सूत्रांनी सांगितले की ते अनेक पर्यायांवर विचार करीत आहेत. परंतु, ईसीबीशी अधिकृतपणे कुठलीही चर्चा झालेली नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट सांगितले की, “आम्ही अनेक पर्यायांचा विचार करत आहोत परंतु याबाबत अधिकृत काहीही मागणी करण्यात आलेली नाही.”

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 ऑगस्ट पासून खेळला जाणार असून, शेवटचा कसोटी सामना 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.

भारतीय संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलिया व मायदेशात इंग्लंड विरुद्ध मालिका विजय मिळवल्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ शानदार कामगिरी करेल, अशी सर्व क्रिकेट पंडितांना आशा आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवत नवा इतिहास कायम करतो अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तो’ स्कूप शॉट पाहून माजी भारतीय क्रिकेटपटूने म्हटले ‘तो यह भी बॉस है’

परफेक्ट जोडी! दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर आपल्या ‘खास’ मित्रासोबत घालवतोय वेळ, बघा फोटो

काय सांगता! अनुष्का शर्मा नाही तर ‘या’ अभिनेत्रीचा विराट कोहली होता मोठा फॅन, स्वत:च दिली कबुली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---