२००७ मध्ये पहिला-वहिला टी२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवला. जिथे टी२० क्रिकेटसाठी नाके मुरडली गेली, त्याच देशात सर्वांना टी२०कडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहायला लावले. एवढेच नाही तर इंडियन प्रीमीयर लीग या टी२० स्पर्धेला जन्माला घालण्याची कल्पनाही त्यानंतर सुचली.
२००८ ला आयपीएलची स्पर्धा सुरु झाली. तेव्हापासून भारतासह अनेक देशांत विविध टी२० लीग गेल्या १३ वर्षांत चालू झाल्या. पण तरीही आयपीएल इतकी प्रसिद्धी कोणत्याही लीगला मिळाली नाही. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. दरवर्षी २ महिन्यांच्या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत साधारण ८ संघात ६० सामने होतात. तर प्रत्येक सामन्यासाठी ३५ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित असतात.
आयपीएल म्हटलं की नेहमीच खेळाडूंना मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चर्चा होते. खेळाडूला प्रत्येक चेंडूमागे किंवा धावेमागे मिळणाऱ्या पैशांचा हिशोब लावला जातो. हे अगदी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच अनेक परदेशी खेळाडूंना देखील कोट्यावधी रुपये मिळत असतात. आयपीएलला सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क, प्रायोजक, जाहिराती अशा अनेक गोष्टींमधून पैसे मिळत असतात. तसेच आयपीएलचे संघ खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात खर्च देखील करत असतात.
आयपीएलमुळे अनेक गरीब घरातून आलेले खेळाडू चांगले कमाई करु लागले आहेत. अगदी खेड्यापाड्यातून शहरापर्यंत अनेक खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये केवळ भारताचेच नाही तर भारताशिवाय अन्य १४ देशांचे खेळडू करारबद्ध झाले आहेत.
त्यामुळे आयपीएलमधून केवळ क्रिकेटपटूंनाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताला विविध स्वरुपातून अर्थिक फायदा होत असतो. बीसीसीआय प्रत्येक वर्षाला आयपीएलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवते. २००८ पासून विचार करायचा झाल्यास बीसीसीआयने जवळपास दरवर्षी खेळाडूंच्या वेतनात वाढ केली आहे. प्रत्येक वर्षी आयपीएल लिलावातही अर्थिक वाढ केली जाते. मागीलवर्षी आयपीएल २०२० साठीचा लिलाव पार पडला. फ्रँचायझींनी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या १८९ खेळाडूंवर एकूण ६१३ कोटी रुपये खर्च केला आहे. म्हणजेच जर सरासरी काढायची झाल्यास प्रत्येक खेळाडूला १४ सामन्यांसाठी ३.२४ कोटी रुपये होतात. पण आयपीएल २०२० साठी सर्वाधिक रक्कम कोणत्या क्रिकेटपटूला मिळणार एक यादी आपण पाहू.
आयपीएल २०२० मधील सर्वात महागडे खेळाडू –
१. विराट कोहली – १७ कोटी रुपये (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
२.पॅट कमिन्स – १५.५ कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
३. एमएस धोनी – १५ कोटी रुपये (चेन्नई सुपर किंग्स)
४. रोहित शर्मा – १५ कोटी रुपये (मुंबई इंडियन्स)
५. रिषभ पंत – १५ कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
एवढेच नाही तर बीसीसीआय वार्षिक मानधन करारात करारबद्ध असणाऱ्या खेळाडूंना वर्षाकाठी कोट्यावधी रुपये देत असते. बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंसाठी अ+,अ,ब आणि क असे ४ श्रेणी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक श्रेणीतील खेळाडूला अनुक्रमे ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये बीसीसीआयकडून वर्षाला मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध असलेल्या खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया मुळ वेतन २७८,१०० ऑस्ट्रेलियन डॉलर (साधारण १.३४ कोटी) देते. ज्यात नंतर १५.९% ची म्हणजे ३१३,००४ ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत वाढ होते.
तसेच भारतात जशी आयपीएल खेळली जाते, तशीच ऑस्ट्रेलियामध्ये बीगबॅश लीग, बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमीयर लीग, पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन बेटांवरील कॅरिबियन प्रीमीयर लीग अशा अनेक टी२० लीग विविध देशात खेळल्या जातात. पण यातही आयपीएलमधून मिळणारा पैसा अन्य लीगच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे.
विविध लीगमध्ये मिळणारी बक्षीस रक्कम –
विजेता संघ – आयपीएल – २.९ मिलियन डॉलर, पीएसएल – ०.६ मिलियन डॉलर, बीपीएल – ०.८५ मिलियन डॉलर, बीबीएल – ०.४५ मिलियन डॉलर
उपविजेता संघ – आयपीएल – १.८ मिलियन डॉलर, पीएसएल – ०.२ मिलियन डॉलर, बीपीएल – ०.३५ मिलियन डॉलर, बीबीएल – ०.२६ मिलियन डॉलर
३ रा क्रमांक – आयपीएल – १.३ मिलियन डॉलर, पीएसएल – ०.१ मिलियन डॉलर, बीपीएल – ०.२० मिलियन डॉलर, बीबीएल – ८०,००० डॉलर (उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना (तिसरा आणि चौथा क्रमांक) प्रत्येकी)
४ था क्रमांक – आयपीएल – १.३ मिलियन डॉलर, पीएसएल – ५०,००० डॉलर, बीपीएल – ०.१५ मिलियन डॉलर, बीबीएल – २०,००० डॉलर (५ व्या क्रमांकाचा संघ)
या व्यतिरिक्त आयपीएलमध्ये सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला १,४०० डॉलर मिळतात. तर पीएसएलमध्ये ४,५०० डॉलर आणि बीपीएलमध्ये ५०० डॉलर मिळतात. तसेच जो खेळाडू स्पर्धेतील सर्वोत्तम ठरतो म्हणजेच मालिकावीर ठरतो त्याला आयपीएलमध्ये १५,००० डॉलर मिळतात. तर पीएसएलमध्ये ८,००० डॉलर आणि बीपीएलमध्ये ५,००० डॉलर मिळतात. तसेच आयपीएलची एकूण बक्षीस रक्कम पाहिली, तर ती ७.२ मिलियन डॉलर इतकी होते. तर पीएसएलची १ मिलियन, बीपीएलची १.५५ मिलियन इतकी आहे.
आयपीएल ही भारतीय लीग असल्याने अर्थातच भारताचे सर्वाधिक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंना सर्वाधिक मानधन मिळते. ४२६ भारतीय खेळाडू या स्पर्धेत आजपर्यंत करारबद्ध झाले आहेत. या खेळाडूंना मिळून आजपर्यंत २३५४ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. आयपीएलमधून सर्व खेळाडूंना मिळालेल्या पैशांच्या ५४.९५ टक्के हिस्सा एकट्या भारतीय खेळाडूंना मिळाला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचे देश –
१. भारत – ४२६ खेळाडू , कमाई – २३,५४१,५६६,९८१ रुपये (एकूण मानधनाच्या ५४.९५टक्के)
२. ऑस्ट्रेलिया – ८४ खेळाडू , कमाई – ६,५३८,१३०,८४३ रुपये (एकूण मानधनाच्या १५.२६टक्के)
३. दक्षिण आफ्रिका – ५२ खेळाडू , कमाई – ४,२८६,३७३,१७२ रुपये (एकूण मानधनाच्या १०.०१ टक्के)
४. वेस्ट इंडिज – २९ खेळाडू , कमाई – २,७९८,९८२,५५० रुपये (एकूण मानधनाच्या ६.५३ टक्के)
५. श्रीलंका – २६ खेळाडू, कमाई – १,९१४,३०३,२५० रुपये (एकूण मानधनाच्या ४.४७ टक्के)
६. न्यूझीलंड – २६ खेळाडू , कमाई – १,५७७,१२९,५५० रुपये (एकूण मानधनाच्या ३.६८ टक्के)
७. इंग्लंड – २२ खेळाडू, कमाई – १,५१३,६२०,९०० रुपये (एकूण मानधनाच्या ३.५३ टक्के)
८. बांगलादेश – ६ खेळाडू , कमाई – २८५,८९५,५०० रुपये (एकूण मानधनाच्या ०.६७ टक्के)
९. अफगाणिस्तान – ४ खेळाडू , कमाई – १८९,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.४४ टक्के)
१० पाकिस्तान – ११ खेळाडू , कमाई – १२८,४८८,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.३० टक्के)
११. नेदरलँड्स – २ खेळाडू , कमाई – ५२,७७०,३०० रुपये (एकूण मानधनाच्या ०.१२ टक्के)
१२. झिम्बाब्वे – ३ खेळाडू , कमाई – १०,३२०,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.२ टक्के)
१३. केनिया – १ खेळाडू , कमाई – २,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.००५ टक्के)
१४. नेपाळ – १ खेळाडू , कमाई – २,०००,००० रुपये (एकूण मानधनाच्या ०.००५ टक्के)
१५. यूएई – १ खेळाडू, कमाई – १,०००,०००, (एकूण मानधनाच्या ०.००२ टक्के)
आता वळूया प्रायोजकत्वाकडे, मागील काही दिवस बीसीसीआय सध्या आयपीएलसाठी मुख्य प्रायोजक म्हणजेच टायटल प्रायोजक शोधत आहे. कारण चायनीज मोबाईल कंपनी विवोने यावर्षीसाठी प्रायोजकत्व देण्यासाठी नकार दिला आहे. भारत आणि चीनमधील वाढते तणाव पाहता, विवोने हा निर्णय घेतला आहे. तसे पाहिले तर विवोचा ३ वर्षांचा करार बाकी आहे. पण हा ३ वर्षांचा करार आता विवो २०२१, २०२२ आणि २०२३ ला पूर्ण करेल. वास्तविक पहाता विवोचा आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून ५ वर्षांचा करार होता. जो २०२२ पर्यंत होता आणि या करारातून बीसीसीआयला वर्षाकाठी ४४० कोटी रुपये मिळतात.
#आत्तापर्यंत आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वातून झालेल्या कमाईबद्दल जाणून घेऊ –
२००८ ते २०१२ – डिएलएफ (एकूण कराराची रक्कम – २०० कोटी, प्रतिवर्षी आयपीएलला दिली जाणारी रक्कम – ४० कोटी)
२०१३ ते २०१५ – पेप्सीको (एकूण कराराची रक्कम – ३९७ कोटी, प्रतिवर्षी आयपीएलला दिली जाणारी रक्कम – ७९.२ कोटी)
२०१६ ते २०१७ – विवो (एकूण कराराची रक्कम – २०० कोटी, प्रतिवर्षी आयपीएलला दिली जाणारी रक्कम – १०० कोटी)
२०१८ ते २०२२ – विवो (एकूण कराराची रक्कम – २१९९ कोटी, प्रतिवर्षी आयपीएलला दिली जाणारी रक्कम – ४४० कोटी)
#प्रसारण हक्कातून होणारी कमाई –
२००८ ते २०१७ – सोनी पिच्चर्स नेटवर्क (कराराची पूर्ण रक्कम – १.०३ मिनियन डॉलर, प्रत्येक सामन्यासाठी दिली जाणारी रक्कम – ११.७ कोटी, प्रत्येक मोसमासाठी दिली जाणारी रक्कम – ७०० कोटी)
२०१८ ते २०२२ – स्टार इंडिया (कराराची पूर्ण रक्कम – २.५५ मिनियन डॉलर, प्रत्येक सामन्यासाठी दिली जाणारी रक्कम – ५४.५ कोटी, प्रत्येक मोसमासाठी दिली जाणारी रक्कम – ३२७० कोटी)
#एकूण आयपीएल महसूल (अंदाजे)
मुख्य प्रायोजक – विवो (प्रत्येकवर्षाची रक्कम – ४४०कोटी)
अंपायर प्रायोजक – पेटीएम (प्रत्येकवर्षाची रक्कम – ३३ कोटी)
असोसिएट प्रायोजक – ड्रिम ११ (प्रत्येकवर्षाची रक्कम – ४४ कोटी)
असोसिएट प्रायोजक – टाटा मोटर्स (प्रत्येकवर्षाची रक्कम – ४० कोटी)
असोसिएट प्रायोजक – एफबीबी (प्रत्येकवर्षाची रक्कम – ३७ कोटी)
असोसिएट प्रायोजक – टेस्टी ट्रिट (प्रत्येकवर्षाची रक्कम – ३७ कोटी)
प्लेऑफ आणि टाईम आऊट प्रायोजक – सीईएटी टायर्स (प्रत्येकवर्षाची रक्कम – २२ कोटी)
टेलिव्हिजन आणि डिजिटल हक्क – स्टार नेटवर्क आणि हॉटस्टार (प्रत्येकवर्षाची रक्कम – ३१२० कोटी)
आयपीएलमधून बीसीसीआय साधारण आपल्या निव्वळ कमाईच्या ५० टक्के अधिकची कमाई करते. यावर्षी अंदाजे बीसीसीआयला एकूण ३८०० कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआय हा नफा भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी वापरते. तसेच बीसीसीआय देशातील प्रत्येक राज्य क्रिकेट मंडळाला जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर निधी देते. तसेच देशांतर्गत स्पर्धांना देखील बीसीसीआय निधी देते. याबरोबरच बीसीसीआय यातून सर्व भारतीय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपटू व कर्मचारी यांना वेतन देते.
यावरुन असेच लक्षात येते की आयपीएलमधून बीसीसीआयला भारतीय क्रिकेटमध्ये विकास साधण्यात मदत होतेच. याशिवाय क्रिकेट व्यतिरिक्त अन्य लोकांनाही रोजगार निर्माण होतो.
(आकडेवारी bizbehindsports ने दिलेल्या वृत्तावरुन घेण्यात आली आहे)
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे केन विल्यमसन
अजब इतिहास! कर्णधाराने शुन्यावर डाव घोषीत करुनही संघाला मिळवून दिला होता विजय
जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात
चालू क्रिकेट सामन्यातच खेळाडू व प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव, क्रिकेट पुन्हा धर्मसंकटात