ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी महिला -20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झाला. गुरुवारी (23 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाच धावांनी पराभूत केले. भारताने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला, पण अखेर पराभव स्वीकारावा लागल. ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी या सामन्यात ‘विलन’ बनली अशती, पण तिच्या चपळाईमुळे तिला ‘मॅच विरन’ म्हणता येऊ शकते.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील हा सामना चांगलाच रोमांचक ठरला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 4 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 167 धावा केल्या. एश्ले गार्डनर हिने ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या विजयात सर्वात महत्वाची भूमिका बजावली. गार्डनरने 18 चेंडूत 31 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 2 महत्वाच्या विकेट्स देखील घेतल्या. ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या विजयात दुसरी स्टार बनली एलिस पेरी (Ellyse Perry) जिने 19 व्या षटकात जबरदस्त क्षेत्ररक्षण करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
एलिस पेरी आयसीसीच्या या टी-20 विश्वचषकात जास्त काही खास कामगिरी करू शकली नाही. पेरीने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने तिच्यावर आधीच टीका होत होती. असात उपांत्य सामन्यात 19 व्या षटकात तिने चौकार जाऊ दिला असता, तर ऑस्ट्रेलियाला ही चूक परवडणारी नव्हती. पेरीने मात्र या संधीचे सोने केले आणि स्टार बनली. शेवटच्या 9 चेंडूत भारताला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. यावेळी खेळपट्टीवर दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा होती. एक मोठा शॉट देखील ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर पाढवण्यासाठी पुरेसा होता.
https://www.instagram.com/reel/CpAtXlyLq99/?utm_source=ig_web_copy_link
एलिस पेरीचे कमाल क्षेत्ररक्षण –
उपांत्य सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना जेस जॉनसेन 19 व्या षटकात गोलंदाजीला आली. या षटकातील चौथा चेंडूवर स्नेह राणाने स्क्वेअरच्या दिशेने जोरदार शॉट खेळला. चेंडू वेगात सीमारेषेपार चालला होता. पण तिथून जवळ उभी असलेली एलिस पेरी चित्त्याच्या चपळाईने धावत आली आणि तिने हा चेंडू सीमारेषेपार जाऊ दिला नाही. सुरुवातीला प्रत्येकाला हा चौकार असल्याचा भास झाला, पण नंतर पेरीने हा चेंडू अडवला होता. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी पेरीचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. पेरीने सामन्याच्या शेवटच्या षटकात राथा यादवचा झेल देखील घेतला.
(Ellyse Perry’s dive knocked the Indian team out of the World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने आमच्या लीगमध्ये खेळावे”, आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या विदेशी कर्णधाराची ऑफर
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे