आयुष बदोनीच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत अ संघाने बुधवारी (24 ऑक्टोबर) इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील शेवटच्या सामन्यात ओमानचा 28 चेंडू बाकी असताना सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यापूर्वीच उपांत्य फेरीत स्थान पक्के करणाऱ्या भारतीय संघाने ओमानला पाच विकेट्सवर 140 धावांवर रोखल्यानंतर 15.2 षटकांत चार गडी गमावून 146 धावा केल्या आणि तीन सामन्यात तीन विजयांसह गटात अव्वल स्थान पटकावले.
उपांत्य फेरीत भारत अ संघा समोर उद्या म्हणजेच (25 ऑक्टोबर) रोजी अफगाणिस्तान अ संघाचे आव्हान असेल. ओमानविरुद्धच्या सामन्यात बदोनीने 27 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने कर्णधार तिलक वर्मासोबत 25 चेंडूत 85 धावांची भागीदारी करत भारताला लक्ष्याच्या जवळ नेले. तिलकने 30 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या.
शानदार फॉर्मात असलेला सलामीवीर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा भारताला वेगवान सुरुवात करून 15 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावांची आक्रमक खेळी केली. तर भारतीय डावाच्या अखेरीस रमणदीप सिंग ( चार चेंडूत नाबाद13) दोन षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला.
For his power packed 51(27), Ayush Badoni is awarded the Player of the Match 🏆
India A qualify for the Semi Finals 👏
Updates ▶️ https://t.co/74D7VIfQa1#OMAvINDA | #ACC | #MensT20EmergingTeamsAsiaCup pic.twitter.com/o6fyDktjFs
— BCCI (@BCCI) October 23, 2024
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ओमानकडून मोहम्मद नदीमने 49 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी वसीम अली (24) सोबत 60 चेंडूत 47 धावांची आणि चौथ्या विकेटसाठी हम्माद मिर्झासोबत 14 चेंडूत 54 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. भारताकडून आकिब खान, रसिक सलाम, निशांत सिंधू, रमणदीप आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा-
रोहित शर्माने केएल राहुलसह या खेळाडूंना वगळले, या स्टार अष्टपैलूचा तीन वर्षांनी संघात प्रवेश
IND VS NZ; पुणे कसोटीत किवी संघानं जिंकला टाॅस, केएल राहुलचा पत्ता कट, गिलचे पुनरागमन!
ind vs nz; न्यूझीलंडचाही इरादा स्पष्ट, कर्णधार म्हणाला, “आम्ही मागे राहणार ….”