नॉटिंघम येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या पहिला कसोटी सामन्याचा आज (०६ ऑगस्ट) तिसरा दिवस होता. या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर काहीवेळातच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही वेळ वाट पाहिल्यानंतरही वातावरण न बदलण्याने अखेर तिसऱ्या दिवसाचा खेळ ज्यावेळी खेळ थांबवण्यात आला. दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ११.१ षटकात बिनबाद २५ धावा केल्या आहेत. तसेच भारताकडे अद्याप ७० धावांची आघाडी आहे. इंग्लंडकडून रॉरी बर्न्स ११ धावेवर आणि डॉमनिक सिब्ली ९ धावांवर खेळत आहे.
भारताकडे ९५ धावांची आघाडी
या सामन्यात भारताचा पहिला डाव ८४.५ षटकात २७८ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने या सामन्यात ९५ धावांची आघाडी मिळवली.
भारताकडून या डावात केएल राहुल ८४ धावांची आणि रविंद्र जडेजाने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ३६ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने २५ आणि जसप्रीत बुमराहने २८ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ४ विकेट घेतल्या.
भारताचे शेपूट वळवळले
दुसऱ्या सत्रात भारतीय फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर लगेचच केएल राहुलने जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. त्याने २१४ चेंडूत ८४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार मारल्या. त्याच्या या विकेटसह अँडरसनने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळचा ६१९ विकेट्सचा विक्रम मोडत तिसरा क्रमांक मिळवला.
राहुल बाद झाल्यानंतर ७१ व्या षटकात शार्दुल ठाकूरला अँडरसननेच बाद करत माघारी धाडले. याचवेळी रविंद्र जडेजाने ७५ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर लगेचच याच षटकात तो ऑली रॉबिन्सनविरुद्ध बाद झाला. त्याने ८६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा केल्या.
त्याच्यानंतर मोहम्मद शमीलाही त्याने १३ धावांवर ८१ व्या षटकात बाद केले. यानंतर मात्र, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने अखेरच्या विकेटसाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना सतवलं. बुमराहने यावेळी काही आक्रमक फटके खेळले. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली आणि भारताची आघाडी ९५ धावांपर्यंत वाढवली. अखेर रॉबिन्सनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बुमराहने आपली विकेट गमावली. त्याने ३ चौकार आणि १ षटकारासह २८ धावा केल्या. मोहम्मद सिराज ७ धावांवर नाबाद राहिला.
Innings Break!#TeamIndia all out for 278.
A splendid batting effort from the tail ensures #TeamIndia take a healthy lead of 95 runs.
@klrahul11 top scores with 84, followed by @imjadeja's 56.
Scorecard – https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND pic.twitter.com/KMcWH0AseM
— BCCI (@BCCI) August 6, 2021
पहिल्या सत्रात भारताची पकड
पावसाच्या व्यत्ययामुळे अवघ्या ११ चेंडूनंतर १३२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. मात्र त्यानंतर खेळास सुरुवात झाल्यावर रिषभ पंतच्या रुपात भारताने पाचवी विकेट गमावली. मात्र पुढे मैदानवर तळ ठोकून असलेल्या केएल राहुल आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी आक्रमक पवित्रा घेत लंच ब्रेकपर्यंत संघाला ८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे.
जडेजाने ५३ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार ठोकत नाबाद २७ धावा केल्या आहेत. यासह त्याच्या कसोटी क्रिकेटमधील २००० धावाही पूर्ण झाल्या आहेत. दुसरीकडे राहुलनेही आक्रमक फटकेबाजी करत लंच ब्रेकपर्यंत नाबाद ७७ धावा चोपल्या आहेत. अशा प्रकारे भारतीय संघाने पहिल्या सत्रात १९.२ षटकात ६६ धावा जोडल्या आहेत.
India are now in the lead.
KL Rahul is still at the crease, batting on 75* 🏏#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN16tXL pic.twitter.com/aqKLuQ7ruA
— ICC (@ICC) August 6, 2021
यष्टीरक्षक रिषभ पंत मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. यासह भारताने ५ गडी गमावत १४५ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. आता अष्टपैलू रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी आला आहे.
ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर सामन्यातील ४९.६ व्या षटकात जॉनी बेयरस्टोच्या हाती झेल देत पंत पव्हेलियनला परतला आहे. त्याने २० चेंडूत १ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने २५ धावा केल्या. पंतनंतर केएल राहुल (नाबाद ५८ धावा) आणि रविंद्र जडेजा खेळत आहेत.
Ollie Robinson gets his second wicket ☝️
Rishabh Pant is caught at cover after hitting a four and a six on back-to-back deliveries.#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN16tXL pic.twitter.com/PV4UvaxwY3
— ICC (@ICC) August 6, 2021
पावसामुळे ११ चेंडूंवर थांबला खेळ
भारतीय संघाने ४ बाद १२५ धावांपासून पुढे तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली होती. सलामीवीर केएल राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत मैदानावर उतरले होते. मात्र केवळ ११ चेंडू टाकल्यानंतर पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. यामुळे ४८.३ षटकांवर खेळ थांबवण्यात आला आहे. भारताने ४ बाद १३२ धावा फलकावर नोंदवल्या आहेत.
राहुल नाबाद ५८ धावा (१५८ चेंडू) आणि पंत १३ धावांवर (१२ चेंडू) आहेत. भारताला इंग्लंडचे आव्हान गाठण्यासाठी अजून ५१ धावांची आवश्यकता आहे. पुढील खेळ ४.१० वाजता सुरू होणार आहे.
And the rain arrives after just 11 deliveries 🌧️#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN16tXL pic.twitter.com/5ow20f7GXi
— ICC (@ICC) August 6, 2021
Play on Day 3 was halted due to rain after 11 balls. It has stopped raining currently, but is quite windy.
Restart at 11:40 local time (4:10PM IST) if no further rain. #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 6, 2021
दुसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा
तत्पुर्वी दुसऱ्या दिवसाखेर भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. त्यांचा पहिला डाव केवळ १८३ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून बुमराहने सर्वाधिक ४ आणि शमीने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शार्दुल ठाकूर (२ विकेट्स) आणि मोहम्मद सिराजनेही (१ विकेट) महत्त्वाचे योगदान दिले होते.
इंग्लंडच्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाखेर भारताचे ४ फलंदाज माघारी परतले होते. सलामीवीर रोहित शर्माने ३६ धावा जोडल्या होत्या. तर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या. अखेर पावसामुळे ४६.४ षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता.