---Advertisement---

कसोटी संपली, आता इंग्लंडविरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेसाठी भारत तयार; पाहा पूर्ण वेळापत्रक

On: बुधवार, जुलै 6, 2022 9:36 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले होते आणि शेवटचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सोडवली. कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला टी-२० सामना ७ जुलै म्हणजेच गुरुवारी खेळला जाईल.

उभय संघातील टी-२० मालिकेचा पहिला आणि शेवटचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होईल. तर मालिकेतील दुसरा व तिसरा सामना रात्री ७ वाजता सुरू होईल. एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना संध्याकाळी ५.३० मिनिटांनी सुरू होईल. तर मालिकेतील दुसरा सामनाही सायंकाळी ५.३० मिनिटांनी सुरू होईल. तर तिसरा व अखेरचा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक 

पहिला टी-२० सामना – ७ जुलै, साउथॅम्पटन (रात्री १०.३० वाजता)

दुसरा टी-२० सामना – ९ जुलै, बर्मिंघम (रात्री ७ वाजता)

तिसरा टी-२० सामना – १० जुलै, नॉटिंघम (रात्री ७ वाजता)

पहिला एकदिवसीय सामना – १२ जुलै, लंडन (सायंकाळी ५.३० मिनिटांनी)

दुसरा एकदिवसीय सामना – १४ जुलै, लंडन (सायंकाळी ५.३० मिनिटांनी)

तिसरा एकदिवसीय सामना – १७ जुलै, मॅनचेस्टर (दुपारी ३.३० मिनिटांनी)

पहिल्या टी-२० सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

तीन वर्षापुर्वी रोहितने रचला होता इतिहास, ११४३ फलंदाजांमध्ये एकट्याने केला ‘हा’ पराक्रम

एका चुकीची शिक्षा आयुष्यभरासाठी? ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात वॉर्नरच्या पत्नीने उठवला आवाज

टीका करण्याआधी ‘हेही’ पाहा, विराट ९ महिन्यात खेळलाय केवळ ‘एवढे’ सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---