भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात सध्या कसोटी सामना खेळत आहे. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव रद्द केला गेला होता, जो यावर्षी पुन्हा खेळला जात आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट सध्या ज्या पद्धचीचे प्रदर्शन करत आहे, ते पाहता या सामन्यातही तो भारतीय गोलंदाजाचा घाम काढू शकतो. दरम्यान, उभय संघातील हा पाचवा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी रुटला एक खास सन्मान मिळाला.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत जो रुट (Joe Root) जबरदस्त फॉर्ममध्ये होता. रुटने या मालिकेत अप्रतिम फलंदाजी तर केलीच, पण वैयक्तिक १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंड संघासाठी दिलेल्या योगदानासाठी रुटला भारताविरुद्धचा पाचवा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच चांदीची बॅट बक्षीस म्हणून मिळाली आहे.
The No.1 Test batter on the @MRFWorldwide ICC Rankings Joe Root was presented with a silver bat to commemorate his 10,000 runs in the longest format 👏#WTC23 | #ENGvIND pic.twitter.com/z2C2ySOYH9
— ICC (@ICC) July 1, 2022
इंग्लंडसाठी १०,००० कसोटी धावा करणारा रुट दुसरा फलंदाज ठरला आहे. रुटने आतापर्यंत खेळलेल्या १२१ कसोटी सामन्यांमध्ये १०२८५ धावा केल्या आहेत. यापूर्वी इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार एलिस्टर कुकने १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. कुकने त्याच्या कारकिर्दीत एकूण १६१ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये १२,००० हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू
१. एलिस्टर कुक – १२४७२ धावा
२. जो रुट – १०२८५ धावा
३. ग्राहम गूच -८९०० धावा
उभय संघातील या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या चार विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर त्यांचा गोलंदाजीचा निर्णय बरोबर ठरताना दिसू लागला होता. परंतु पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने खेळपट्टीवर पाय जमवले आणि संघाला ३०० पार घेऊन गेला. त्याने सामन्याच्या या पहिल्या डावात १११ चेंडूत १९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या. तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील शतक ठोकले.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड चाच्यातील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी २ भारताने, तर एक इंग्लंडने जिंकला होता. राहिलेला एक सामना अनिर्णीत झाला होता. भारत सध्या कसोटी मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. इंग्लंडला जर या मालिकेतील त्यांचा पराभव टाळायचा असेल, तर हा पाचवा आणि शेवटचा सामना जिंकावा लेगाले. भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत जरी केला, तरी मालिका त्यांच्या नावावर होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल
सर जडेजा अभी जिंदा है! सीएसके मॅनेजमेंटला इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून दिलं उत्तर