---Advertisement---

एकदिवसीय मालिकेत भारताला सतवायला इंग्लंडचे ‘हे’ खेळाडू सज्ज, कसोटीनंतर वनडेत करणार पुनरामन

Jason-Roy-Jos-Buttler
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मागच्या वर्षी सुरू झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका यावर्षी २-२ अशा बरोबरीने सुटली. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली, जी भारताने १-२ अशा फरकाने जिंकली. आता १२ जुलैपासून या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघापुढे जॉनी बेयरस्टो, जो रुट आणि बेन स्टोक्स यांन लवकर बाद करण्याचे आव्हान असेल. 

जो रुट –
भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये जो रुट (Joe Root) याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याने आतापर्यंत भारताविरुद्ध खेळलेल्या १८ सामन्यांतील १६ डावांमध्ये ५६ च्या सरासरीने ७२८ धावा केल्या आहेत. ३ शतक आणि ३ अर्धशतकांचा यामध्ये समावेश आहे. नाबाद ११३ धावा हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. त्याने भारताविरुद्ध नुकत्याच पार पडललेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ७०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आता एकदिवसीय मालिकेतही रुट भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

जॉनी बेयरस्टो –
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी चांगली राहिली आहे. बेयरस्टोने भारताविरुद्ध १४ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यातील १३ डावांमध्ये ४९ च्या सरासरीनने ५८२ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच स्ट्राईक रेट १०८ चा राहिला आहे. बेयरस्टोचे आलिकडचे प्रदर्शन पाहता, तो एकदिवसीय मालिकेत भारताचा घाम काडण्याची पूर्ण शक्यता आहे.

बेन स्टोक्स –
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) पुनरागमन करत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार  स्टोक्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्टोक्सचे भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमधील प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याने खेळलेल्या १४ डावांमध्ये ४० च्या सरासरीने आणि १०५ च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतकही निघाले.

गोलंदाजीतही स्टोक्सने कमाल केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टोक्सने भारतीय खेळाडूंना १३ वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. गोलंदाजीत त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन ३४ धावा खर्च करून ३ विकेट्स, हे राहिले आहे. स्टोक्सने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या आणि अवघ्या २४५ धावांवर भारतीय संघ संघ सर्वबाद झाला. एकदिवसीय मालिकेतही स्टोक्स अशाच पद्धतीचे प्रदर्शन करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘धवन-रोहित’ची जोडी करणार कमाल, पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘गांगुली-सचिन’ची करणार बरोबरी

क्रिकेट दिग्गजांचे म्हणणे बीसीसीआयने ऐकले?, विराट कोहली पहिल्या वनडेतून बाहेर होण्याची शक्यता

कहर! आयपीएलचे आयोजन अन् रशियन लोकांची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---