भारताचा इंग्लंड दौरा निर्णायक सामन्यांच्या मालिकांमध्ये यशस्वी ठरला आहे. तीन सामन्यांच्या या मालिका भारताने २-१ने जिंकल्या आहेत. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला. तसेच शेवटच्या वनडे सामन्यात २६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी विशेष खेळी करत संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात भारताने ४२.१ षटकातच लक्ष पूर्ण करत मालिका जिंकली. यावेळी पंतने केलेल्या खेळीचे भारताच्या माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर बाकी देशातील माजी खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले, “पंतकडे कट शॉट, पुल शॉट, रिवर्स स्वीप आहे. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला. इंग्लंडमध्येही तसेच झाले आहे.”
शोएबने पंतचे कौतुक केले असता त्याने एक सल्लाही दिला आहे. त्याने पंतला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने म्हटले, “पंत जरा ओव्हरवेट आहे. मला आशा आहे की तो आपल्या वजनाबबात योग्य ती काळजी घेईल. तो दिसायला चांगला आहे. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये तो रोल-मॉडेल बनू शकतो. त्यातून तो कोटींची कमाईही करू शकतो. कारण भारतात एखादा व्यक्ती स्टार बनला तर तो आणखी मोठा स्टार बनतो.”
पंतच्या इंग्लंड विरुद्धच्या खेळीबद्दलही शोएबने म्हटले, “त्याने विचारपूर्वक शॉट खेळत सामना पुढे नेला. नंतर त्याने धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच त्याने अनेक सामन्यांच अशी खेळी केली आहे. यामुळे पंतला कोणी नाही तर पंतच थाबंवू शकतो. त्याची फलंदाजीची लय अशीच कायम राहिली तर तो पुढच्या काळाच सुपरस्टार नक्कीच बनेल.”
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पंतने ११३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद १२५ धावा केल्या. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. तर ३१ कसोटीत ५ शतके करणाऱ्या या खेळाडूला वनडेमध्ये पहिल्या शतकासाठी २७ सामने खेळावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसून सराव, पौष्टिक आहार आणि भरपूर झोप- स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा युवकांना सल्ला
पुजारा अन् सुंदरने गाजवलंय काऊंटी क्रिकेट, पहिल्याच सामन्यात केली विशेष कामगिरी