इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव याने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन आणि शतक ठोकले. उभय संघातील या सामन्यात भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाली, पण सूर्यकुमारच्या शतकामुळे संघ भक्कम स्थितीत पोहोचू शकला. सूर्यकुमार भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पाचवा खेळाडू बनला आहे. मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघासाठी यापूर्वी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि दीपक हुड्डा या चौघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. या पाच खेळाडूंपैकी सूर्यकुमार आणि केएल राहुलचे शतक खास ठरले आहे, कारण या दोघांनी केलेले शतक चौथ्या क्रमांकावर किंवा खालच्या फळीत खेळताना केले आहे.
सूर्यकुमारने हे शतक अवघ्या ४८ चेंडूत पूर्ण केले, यामध्ये १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याने या सामन्यात एकूण ५५ चेंडू खेळले, ज्यामध्ये १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. शेवटच्या षटकात भारतीय संघाला २१ धावांची आवश्यकता होती, परंतु सूर्यकुमारने तोपर्यंत विकेट गमावली होती. सूर्यकुमार त्यावेळी खेळपट्टीवर असता, तर भारतीय संघाने सामना जिंकला असता.
https://twitter.com/BCCI/status/1546176195439517696?s=20&t=hbFncUmdSiaDtVM-682-Iw
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जोस बटलरचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि त्यांचा संघ ७ विकेट्च्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना १७ धावांनी जिंकला.
इंग्लंडसाठी वरच्या फळीत फलंदाजी करताना डेविड मलानने ३९ चेंडूत सर्वाधिक ७७ धावा केल्या. तर दुसरीकडे भारतासाठी सूर्यकुमार सर्वाधिक धावांचे योगदान देणारा खेळाडू ठरला. सूर्यकुमारव्यतिरिक्त भारताचा दुसरा एकही फलंदाज ३० धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटर्स कोणत्या कार वापरतात माहित आहे का?, धोनीकडे तर आहे मोठे कलेक्शन
टीम इंडियाची व्हाईटवॉशची संधी हुकली, पण सूर्यकुमार काय भारी खेळला; वाचा सामन्याबद्दल सर्वकाही
SLvsAUS Test: दिनेश ऍण्ड रमेश ऑन द क्रिज, चंडिमलच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला टाकले बॅकफूटवर





