इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. पहिल्या डावात भारताने १३२ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ३ विकेट्सच्या नुकसानावर १२५ धावा केल्या. आता चौथ्या दिवसाचा खेळ खूपच महत्वाचा असेल. भारताला कमीत कमी ४०० धावांची आघाडी घ्यावी लागेल, जेणेकरून संघाचा विजय सोपा बनू शकतो.
भारताविरुद्धचा हा कसोटी सामना खेळण्यापूर्वी इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले होते. न्यूझीलंडविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. शेवटच्या डावात त्यांना विजयासाठी २९६ धावांची गरज होती. हे लक्ष्य त्यांनी ५४.२ षटकात गाठले. यादरम्यान त्यांचा रनरेट ५.४४ होता, जो कसोटी क्रिकेटच्या मानाने खूपच चांगला म्हणता योऊ शकतो. जॉनी बेयरस्टोने ४४ चेंडूत ७१ धावा केल्या. स्ट्राईक रेट १६१ होता. माजी कर्णधार जो रुटने ८६ आणि ऑली पोपने ८२ धावांचे योगदान दिले होते.






