इंग्लंड विरुद्ध भारत, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच भारताने मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय खेळाडूंनी चौथ्या सामन्यात त्यांच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि चाहतेही त्यांच्या या खेळीमुळे खुश दिसत आहेत. कसोटी मालिकेदरम्यान हिंदी सामालोचकाच्या रूपात जोडले गेलेल्या माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ याने भारतीय संघाच्या ओव्हलवरील विजयानंतर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तो नागिन डान्स करताना दिसत आहे.
मोहम्मद कैफने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने केलेल्या डान्समागे एक कारण आहे. त्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान असे म्हटले होते की, जर इंग्लंडमध्ये भारतीय संघ कसोटी मालिका जिंकला तर, तो नागिन डान्स करेल. त्यानंतर भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयासह मालिकेतील आपला पराभव टाळला आहे. आता चौथा सामना जिंकत किंवा अनिर्णीत राखत मालिका खिशात घालण्याची त्यांच्याकडे संधी असेल.
त्यामुळे लगेच कैफने चाहत्यांना दिलेला शब्द पाळत नागिन डान्स करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतो आहे.
https://www.instagram.com/p/CThGHTAFiMM/?utm_source=ig_web_button_share_sheet
चौथ्या सामन्यादरम्यान मोहम्मद कैफ आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हे दोघे समालोचन करत होते. सेहवागनेच कैफला त्याने दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. समालोचनादरम्यान सेहवागने कैफला म्हटले की, चाहत्यांची ही मागणी त्याला पूर्ण करावी लागेल. यानंतर कैफनेही चाहत्यांना दिलेला शब्द पाळत नागिन डान्सचा व्हिडिओ चाहत्यांसाठी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केला आहे. समालोचनादरम्यान कैफ मुंडी डान्सही केलेला दिसला. याबाबत त्याने व्हिडिओ पोस्ट करत मुंडी डान्सविषयी लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CTep0PZojm2/?utm_source=ig_web_button_share_sheet
कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमधील मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने त्याच्या संघात जोस बटलर आणि जॅक लीच या दोन खेळाडूंना पुन्हा सामील केले आहे. मालिकेतील चौथा सामना जर इंग्लंडने जिंकला तर मालिका २-२ अशा बरोबरीने सुटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या ‘तुतारी सेलिब्रेशन’वर बार्मी आर्मीची खिलाडूवृत्ती; म्हणाले, ‘बरोबरीचा खेळ राहिला, आता…’
ओव्हलच्या ऐतिहासिक विजयावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया की माजी इंग्लिंग कर्णधाराला लागली मिर्ची
‘थँक्यू विराट!’, कर्णधार कोहलीच्या कसोटी प्रेमावर प्रभावित झाला महान ऑसी गोलंदाज