इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. विशेषतः लॉर्ड्स किंवा मँचेस्टरच्या मैदानावर कसोटी सामना खेळला जात असताना तर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. या मैदानांवर जेव्हा जेव्हा कसोटी सामना होतो तेव्हा प्रेक्षक मोठ्या संख्येने दिसतात. अनेक वेळा कसोटीच्या पाचही दिवस संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल राहते. असेच दृश्य इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) यांच्यात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळत आहे.
21 ऑगस्टपासून मँचेस्टरमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली ज्यात पहिल्या दिवशी श्रीलंकेचा संघ 236 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने 6 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी युवा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथने शानदार शतक झळकावून इंग्लंडसाठी इतिहास रचला. इंग्लंडकडून कसोटीत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
YES, SIR! 🫡
Take incredible catch ✅
Don’t spill a drop ✅
Impress the coaches ✅ pic.twitter.com/IamoUULjmb— England Cricket (@englandcricket) August 23, 2024
आश्चर्यकारक झेलने शो चोरला
मात्र कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, केवळ जेमी स्मिथनेच चर्चा लुटली नाही तर, प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका चाहत्यानेही शो चोरण्यात यश मिळवले. सामन्याचा आनंद घेताना या चाहत्याने असे काही केले जे अनेकवेळा मैदानात उपस्थित क्षेत्ररक्षकांनाही जमत नाही. खरे तर, इंग्लंडच्या पहिल्या डावातील 83 व्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडोने मार्क वुडकडे एक शॉर्ट चेंडू टाकला. वुडने या चेंडूचा फायदा घेतला आणि जोरदार पुल शॉट खेळला, ज्यामुळे चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने सीमारेषेबाहेर गेला आणि स्टँडकडे जाऊ लागला. हा चेंडू पकडण्यासाठी अनेक प्रेक्षकांमध्ये स्पर्धा सुरू होती, पण शेवटी विजेता तो प्रेक्षक ठरला ज्याच्या एका हातात बिअरचा मोठा ग्लास काठोकाठ भरलेला होता. या प्रेक्षकाने एका हाताने अप्रतिम झेल तर घेतलाच पण आपल्या बिअरचा एक थेंबही खाली पडू दिला नाही. अशातच स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक हा झेल पाहून थक्क झाले. आता या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंड क्रिकेटने या झेलचा व्हिडिओ एक्स वर शेअर केला आहे.
हा झेल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकच नव्हे तर डगआऊटमध्ये बसलेले इंग्लंड संघाचे मार्गदर्शक पॉल कॉलिंगवूड देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी एका हातात बिअरचा ग्लास धरून हा शानदार झेल घेणाऱ्या प्रेक्षकांचे कौतुक करू लागले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा –
इशान किशनने वाढवली प्रशिक्षक गंभीरची डोकेदुखी! फलंदाजीनंतर गोलंदाजीत करतोय कमाल
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डेंग्यूतून सावरला वेगवान गोलंदाज, दुलीप ट्रॉफीत खेळणार
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम