---Advertisement---

तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट

---Advertisement---

लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले आहे.

त्यामुळे तब्बल 47 वर्षांनंतर ऍशेस मालिका बरोबरीत सुटली आहे. याआधी 1972 मध्ये झालेली ऍशेस मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ऍशेस मालिकेत बरोबरी झाली आहे. 

तसेच आत्तापर्यंत ऍशेस मालिका बरोबरीत सुटण्याची ही सहावी वेळ आहे. 

यावर्षीची ऍशेस मालिका जरी बरोबरीत संपली असली तरी ऍशेस ट्रॉफी आपल्याकडेच राखण्यात ऑस्ट्रेलियाने यश मिळवले आहे. कारण त्यांनी 2017-18 ला झालेल्या ऍशेस मालिकेत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी यावर्षी ऍशेस मालिकेत पराभव स्विकारलेला नाही.

पाचव्या ऍशेस सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव रविवारी 329 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 69 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 77 षटकात सर्वबाद 263 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 225 धावां करता आल्या होत्या.

बरोबरी झालेल्या ऍशेस मालिका – 

1-1 – 1938 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1962/63 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1965/66 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1968 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

2-2 – 1972 (इंग्लंडला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

2-2 – 2019 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रो कबड्डीत कोणालाही न जमलेला ‘तो’ विक्रम परदीप नरवालने करुन दाखवला!

पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा विजय; मालिकेतही साधली बरोबरी

टीम इंडियात संधी न मिळालेला दिनेश कार्तिक सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment