---Advertisement---

इंग्लंडकडून बांगलादेशचा सलग दुसऱ्या सामन्यात सुपडा साफ! दणदणीत विजयासह केली मालिका नावे

On: शुक्रवार, मार्च 3, 2023 8:25 PM
---Advertisement---

बांगलादेश आणि इंग्लंड (BANvENG) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (3 मार्च) खेळला गेला. इंग्लंड संघाने सलग दुसऱ्या सामन्यात वर्चस्व गाजवताना यजमान संघाचा 132 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) याला त्याच्या शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने चार गडी राखून आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने चुकीचा ठरवला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. त्याचे इतर साथीदार देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्याला कर्णधार जोस बटलर याची साथ मिळाली. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला 200 पार नेले. रॉयने यादरम्यान आपले शतक पूर्ण केले. त्याने 132 धावांची खेळी केली.

रॉय बाद झाल्यानंतर बटलरने 76 धावांची आक्रमक खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये अष्टपैलू मोईन अलीने 41 व सॅम करनने नाबाद 33 धावा करून संघाला 326 पर्यंत मजल मारून दिली. बांगलादेशसाठी तस्कीन अहमदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने आपले पहिले तीन बळी अवघ्या नऊ धावेत गमावले. त्यानंतर कर्णधार तमीम इक्बाल व अनुभवी शाकीब अल हसन यांनी 79 धावांची भागीदारी केली. तमिमने 35 तर शाकिबने 58 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोहम्मदुला वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने बांगलादेशला विजयी लक्ष पार करता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 194 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडसाठी सॅम करन व आदिल रशीद यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. मालिकेतील अखेरचा सामना 6 मार्च रोजी खेळला जाईल.

(England Beat Bangladesh In 2nd ODI By 132 Runs Roy Curran Rashid Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
दिग्गजाने रोहितच्या नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह! म्हणाला, “कर्णधार म्हणून तो कमी पडला” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---